डाकू आमदाराला तीस वर्षे निवडून कसे दिले : एकनाथ खडसे

डाकू आमदाराला तीस वर्षे निवडून कसे दिले : एकनाथ खडसे
Eknath Khadse
Eknath Khadsesaam tv
Published On

वरणगाव (जळगाव) : मला जर शिवसेनेचे पालकमंत्री डाकू म्हणत असतील, मुक्ताईनगर मतदारसंघातील मतदारांनी तीस वर्षे मला निवडून कसे दिले, असा खोचक सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लगावला. (jalgaon news Eknath Khadse reply to Gulabrao Patil statement)

Eknath Khadse
Nandurbar: लाल मिरचीला विक्रमी दर..जवळपास झाली ५५ कोटींची उलाढाल

वरणगाव (Varangaon) कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) परिसंवाद मेळावा झाला. त्यावेळी खडसे बोलत होते. माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभय्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, बरकत अली आदी व्यासपीठावर होते.

माझ्या कारकीर्दीत झालेल्‍या कामांचे काही लोक उद्‌घाटन करताय

खडसे म्हणाले, की बोदवड नगरपरिषद निवडणुकीत छुपी युती झाली होती. परिसरातील कोट्यवधींची विकासकामे माझ्या कारकीर्दीत झालेली असून, अनेक लोक त्याचे उद्‌घाटन करीत आहेत. गुलाबराव पाटलांच्या (Gulabrao Patil) नावाची सुरवातच कशी आहे, हे आपणास चांगले ठाऊक आहे. जर मला शिवसेनेचे नेते डाकू म्हणत असतील तर एखाद्या डाकूला तीस वर्षे निवडून कसे दिले, असा खोचक सवालही त्यांनी पालकमंत्री पाटील यांना केला. पालिकेत सत्ता मिळवायची असेल, तर जोमाने काम करावे लागेल आणि जे लोक चुगलखोरी करतात, त्यांना आधी बाहेर काढा, असे त्यांनी जिल्हाध्यक्षांना सांगितले. विविध शाखा व पदाधिकाऱ्यांना या वेळी नेमणूकपत्र देण्यात आले. तसेच, अनेक युवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com