Jalgoan Corporation saam tv
महाराष्ट्र

महापालिकेच्या आणखी एका भाजप नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

संजय महाजन

जळगाव : महापालिकेतील नगरसेवकांच्या इकडून तिकडे उड्या सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे ४ नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला होता. यानंतर सोमवारी पुन्हा भाजपच्या नगरसेविका रुकसानाबी गबलू खान य‍ांनी पालकमंत्री गुलाबराब पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्‍थीतीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. (jalgaon news Another BJP corporator of joins shiv Sena)

जळगावातील (Jalgaon) अजिंठा विश्रामगृहात भाजपच्या (BJP) प्रभाग १ च्या नगरसेविका रुकसानाबी गबलू खान यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, चेतन सनकत, कुंदन काळे आदी उपस्थित होते.

त्‍यांचा भाजपमध्‍ये असल्‍याचा दावा

भाजपचे एक-एक नगरसेवक शिवसेना आपल्याकडे ओढुन घेत आहे. वर्षभरापुर्वी जळगाव मनपात (Jalgaon Corporation) बहुमतात असलेली भाजपा आज विरोध करण्यासाठी देखील सक्षम राहिली नाही. गेल्या आठवड्यात शिवसेनेने भाजपचे चार नगरसेवक आपल्याकडे ओढून घेतले होते. तर आणखी दोघांनी ऐनवेळी शब्द बदलला होता. आम्ही भाजपात असल्याचा दावा करणाऱ्या दोन्ही नगरसेविकांनी महासभेप्रसंगी शिवसेनेच्या तंबूत बसूनच सहभाग नोंदविला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT