खासदार रक्षा खडसेंच्या कार्यालयावर काँग्रेसचा आक्रोश

खासदार रक्षा खडसेंच्या कार्यालयावर काँग्रेसचा आक्रोश
Congress
Congresssaam tv
Published On

जळगाव : काँग्रेसचे महाराष्ट्रभर खासदार आणि भाजप मंत्र्यांच्या कार्यालय आणि घरासमोर निदर्शने आंदोलने सुरू आहेत. यातच रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यालयावर आज काँग्रेसच्यावतीने (Congress) जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. (jalgaon news muktainagar Congress protests at MP Raksha Khadse office)

Congress
विद्यार्थ्याकडूनही लाच; वस्तीगृहात प्रवेशासाठी मागितले पाच हजार

काँग्रेसच्यावतीने मुक्ताईनगर (Muktainagar) येथील परिवर्तन चौकातून शेकडोंच्या संख्येने पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. महाराष्‍ट्र कॉंग्रेसबाबत (Maharashtra) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्‍या आरोपाच्‍या विरोधात सद मोर्चे काढले जात आहेत. मुक्‍ताईनगर येथे काढलेल्‍या मोर्चामध्ये (Narendra Modi) नरेंद्र मोदी शर्म करो शर्म करो, नरेंद्र मोदी महाराष्ट्राची माफी मागा, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.

टाळ्या वाजवत घोषणाबाजी

निघालेला हा मोर्चा मुक्ताईनगर येथील खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या कार्यालयावर पोहोचला व रक्षा खडसे यांच्या कार्यालयासमोर टाळ्या वाजवत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रावेरचे आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्या व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com