गर्भवती 
महाराष्ट्र

आठ महिन्‍याच्‍या गर्भवतीला दुचाकीची समोरून धडक; महिलेचा मृत्‍यू

आठ महिन्‍याच्‍या गर्भवतीला दुचाकीची समोरून धडक; महिलेचा मृत्‍यू

Rajesh Sonwane

जळगाव : शतपावलीसाठी पायी चालणाऱ्या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेस दारूच्या नशेत असलेल्या दुचाकीस्वाराने समोरून धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. सदर घटना वावडदा– म्हसावद मार्गावर घडली. (jalgaon-news-accident-news-eight-month-old-pregnant-woman-hit-by-two-wheeler-and-Death)

वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही महिला आठ महिन्‍याची गर्भवती होती. ज्‍योती या नणंद मीना व दीपाली यांच्‍यासोबत शतपावली करत होत्या. या दरम्‍यान सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा) हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत ज्योती यांना समोरून जोरदार धडक देत २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्‍यान ज्‍योती यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार हा दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले.

मृतदेह स्वीकारण्यास नकार

सकाळी ज्योती गोपाळ यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातून स्वीकारण्यास कुटुंबियांनी नकार दिला. या महिलेच्या कुटुंबियांनी संबंधीत दोषीवर कठोर कारवाई होत नाही; तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

महिलेच्‍या कुटूंबियांना धमकावले

दुर्घटना घडल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी मयत महिलेच्या २ नणंदांसह सासूला त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत धमकावले. ज्या दुचाकीने धडक दिली ती आरोपीच्या कुटुंबीयांनी लपवली असल्याचे सांगण्यात आले. आरोपीचे कुटुंबीय त्यानंतर फरार झाले असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्‍यान दुचाकीस्‍वाराने जाणीवपूर्वक माझ्या भावजयीला मारून टाकण्यासाठीच वाहनांची धडक दिल्याचा आरोप या महिलेच्या नणंदांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post viral fatigue: ताप गेल्यानंतरही अशक्तपणा जात नाहीये? या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Plane Crash : हवाई दलाचे विमान कोसळले, ५ जवानांचा मृत्यू, देशावर शोककळा

Reel Star Prem Bhatia Accident: सुप्रसिद्ध रीलस्टारच्या दुचाकीचा अपघात, प्रेम भाटीचा उपचारादरम्यान मृत्यू

Matheran Trip Budget : मुंबई-पुण्याजवळचा स्वर्ग! माथेरान ट्रिपचा खर्च किती येतो? जाणून घ्या

RBI ची मोठी कारवाई! राज्यातल्या 'या' सहकारी बँकेवर 6 महिन्यांसाठी बंदी

SCROLL FOR NEXT