रावेर (जळगाव) : तुलसी विवाहास आजपासून (ता. १५) पासून प्रारंभ होत आहे. पौर्णिमेपासून हा सोहळा चालणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे शनिवारपासून (ता. २०) विवाह सोहळ्यांना धूमधडाक्यात प्रारंभ होत आहे. या विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालये, वाजंत्री, भटजी, घोडेवाले, आचारी यासह सर्व सज्ज झाले आहेत. यामुळे विवाहेच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (jalgaon-news-Wedding-marriage-fanction-start-from-Saturday)
गेल्या वर्षी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विवाह समारंभात मंगल कार्यालय, वाजंत्री, वर मिरवणुकीवर निर्बंध होते. तर वधू-वरांच्या आप्तेष्टांवरही गर्दीचे नियंत्रण होते. यामुळे अनेकांनी विवाह समारंभ पुढे ढकलले होते. गेल्या चार, पाच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे प्रशासनाने विवाह समारंभात मास्क, सॅनिटायझरचा वापर करून विवाह कार्यात शिथीलता दिल्यामुळे वधू - वर पक्षांत उत्साहाचे वातावरण आहे.
तुलसी विवाहास प्रारंभ
आज (ता. १५) कार्तिक शुद्ध एकादशी ते शुक्रवार (ता. १९) कार्तिक शुद्ध पौर्णिमा या पाच दिवसांत देशात तुलसी विवाह होतात. तुलसी विवाह सुरू होताच वधू - वरांच्या विवाह समारंभांना सुरुवात होते. प्रशासनाच्या काहीअंशी शिथिलतेमुळे विवाह कार्यासाठी मंगल कार्यालये, वाजंत्री, डीजे, घोडेवाले, मंडप, आचारी, भटजी सज्ज झाले आहेत.
गुडघ्याला बाशिंग पण..
विवाहासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना सावधान शुभमंगल म्हणण्याची लग्नघटिका जवळ येऊन ठेपली आहे. साखरपुडा झालेले उपवरांचे नातेवाईक जवळची तिथी पकडण्यासाठी धावपळ करीत आहेत.
यंदा ६३ विवाह मुहूर्त
यंदाचे लग्न मुहूर्त नोव्हेंबर २०२१ : २०, २१, २९, ३० डिसेंबर १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९ जानेवारी २०२२ : २०, २२, २३, २७, २९. फेब्रुवारी : ५, ६, ७, १०, १७, १९. मार्च २६, २७, २८; एप्रिल : १५, १७, १९, २१, २४, २५. मे ४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७. जून १, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२. जुलै : ३, ५, ६, ७, ८, ९.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.