Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : वीजपुरवठा जोडून देण्यासाठी २० हजाराची लाच; वायरमन एसीबीच्या ताब्यात

Jalgaon News : जळगाव शहरातील संभाजीनगर परिसरातील तक्रारदारांच्या घराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. या घरासाठी नवीन खांब टाकला होता. त्या खांबावरून वीजपुरवठा मिळण्यासाठी तक्रारदार शिरसोली येथील महावितरण कार्यालयात अर्ज केला

Rajesh Sonwane

जळगाव : वीजपुरवठ्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरसोली युनिटचे वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. याप्रकरणात शिरसोली युनिटच्या ज्युनिअर इंजिनिअरचे नावही समोर येत असून लाचखोरीचा झटका त्यांनाही बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जळगाव (Jalgaon) शहरातील संभाजीनगर परिसरातील तक्रारदारांच्या घराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. या घरासाठी नवीन खांब टाकला होता. त्या खांबावरून वीजपुरवठा मिळण्यासाठी तक्रारदार शिरसोली येथील महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी ते गेले असता संशयित वायरमन विक्रांत पाटील याने काम करून देण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची (Bribe Trap) मागणी केली होती. यापैकी १० हजार रुपये या अगोदर घेतले होते. तरीही वीजपुरवठा मिळत नव्हता. त्यासाठी उर्वरित २० हजार रुपयांची मागणी होत असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) १८ ऑक्टोबरला तक्रार दिली होती. 

तक्रारीची दखल घेत अजिंठा चौफुली परिसरातील एका हॉटेलबाहेर विक्रांत पाटील याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद केली असून अटकेतील संशयिताला जिल्‍हा न्यायालयात हजर केले. यावेळी या लाच प्रकरणात संबंधित वायरमनचा ज्युनिअर इंजिनिअर सपकाळे यांचा देखील उल्लेख आला असून लाच प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीसाठी संशयिताच्या कोठडीची मागणी सरकारपक्षाने केली होती. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calculator: कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? कोणालाच माहित नाही

Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

SCROLL FOR NEXT