Jalgaon News Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू; वाचवायला गेलेला भाऊही जखमी

विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू; वाचवायला गेलेला भाऊही जखमी

Rajesh Sonwane

कुऱ्हा काकोडा (जळगाव) : शेतात काम करीत असताना विजेचा शॉक (Electric Shock) लागून १७ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पारंबी (ता. मुक्ताईनगर) गावात घडली. या घटनेमुळे गावात (Muktainagar) हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत शॉक लागलेल्या विद्यार्थ्याला वाचवताना त्याचा मोठा भाऊ जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

पारंबी (ता. मुक्ताईनगर) येथील शेतकरी संतोष झांबरे यांना दोन मुले असून मोठा चेतन हा जळगाव येथे शिकतो. तर लहान गौरव हा नुकताच दहावीची परीक्षा ८३ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊन त्याने अकरावीत प्रवेश घेतलेला होता. गौरव हा शाळेत जाण्यापूर्वी शेतातून येतो असे सांगून आपल्या मोठ्या भावासोबत १ जुलैला सकाळी शेतात गेला. त्या ठिकाणी गौरवला विजेच्या वायरचा जबर शॉक लागल्याने तो वायरला चिटकला. त्याला वाचविण्यासाठी त्याचा मोठा भाऊ चेतन गेला असता, तो जोराने फेकला जाऊन गंभीररित्या जखमी झाला.

आईचा आक्रोश

घटना घडताच आजूबाजूचे शेतकरी धावून आले. मात्र, तोपर्यंत निपचित पडलेला होता. आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहताच त्याच्या आईने एकच आक्रोश केला. दोन्ही भावडांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, पुढील उपचारार्थ मलकापूरला पाठवण्यात आले. तेथे गौरवला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT