Muktainagar News Saam tv
महाराष्ट्र

Muktainagar News : दुर्दैवी घटना.. भावाला वाचविण्यासाठी तलावात मारली उडी; दोघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

Rajesh Sonwane

मुक्ताईनगर (जळगाव) : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी शिवारातील तलावात घडली. एकाच कुटुंबातील दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने परिवाराने मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील सालबर्डी गावातील वेदांत कृष्णा ढाके (वय १६) व चिराग कृष्णा ढाके (वय ११) अशी घटनेत मृत झालेल्या मुलांची नवे आहेत. या दोघांचे वडील रिक्षा चालवून तर आई शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान वेदांत व चिराग या दोघांनी रविवारी दुपारी कटिंग केली. यानंतर दोघेजण सालबर्डी शिवारातील तलावावर पोहण्यासाठी गेले होते. तलावात पोहण्यासाठी उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. 

भावाला वाचवायला गेला पण.. 

लहान भाऊ चिराग हा पाण्यात बुडत असल्याचे वेदांतच्या लक्षात आले. त्याला वाचवण्यासाठी वेदांत हा देखील तलावात उतरला. मात्र दोघांचाही पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. सदरच्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही मुलांचा मृतदेह पाहून आईने एकच आक्रोश केला. घटनेची मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karwa Chauth 2024 : करवा चौथच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान; अखंड सौभाग्यवती राहाल

Uddhav Thackaeray Health: उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी; ब्लॉकेज आढळल्यानं लगेच शस्त्रक्रिया

Baba Siddique News : सलमानशी मैत्री, बिश्नोईची धास्ती; धमकी, रेकीनंतर मित्राला संपवलं, पाहा स्पेशल रिपोर्ट

Bath Tips : तुम्हीही अंघोळ करताना या चुका करता? वाचा आणि सवयी बदला

Canada vs India : भारत आणि कॅनडात तणाव; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले, काय आहे कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT