Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Snake Bite : घराच्या बाहेर काम करताना घडले दुर्दैवी; सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : सर्पाने डाव्या हाताला दंश केला. काही तरी चावल्याचे लक्षात आले. यानंतर हाताची आग होऊ लागली. यामुळे कुटुंबीयांनी तातडीने त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : पावसाळ्याचे दिवस असल्याने साप बाहेर येऊन गवतात किंवा कोपऱ्यात येत येत असतात. अशाच प्रकारे आडोश्यात कोपऱ्यामध्ये असलेल्या सापाने घराच्या बाहेर काम करणाऱ्या तरुणाला दंश केला. विषारी नाग जातीचा साप असल्याने काही तासातच तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

जामनेर (jamner) तालुक्यातील गारखेडा या गावात हि दुर्दैवी घटना घडली असून यात राजू संतोष गायकवाड (वय २०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. राजू गायकवाड हा सायंकाळच्या सुमारास घराजवळ काम करीत होता. याच वेळी नाग जातीच्या सर्पाने डाव्या हाताला दंश केला. काही तरी चावल्याचे लक्षात आले. (Snake Bite) यानंतर हाताची आग होऊ लागली. यामुळे कुटुंबीयांनी तातडीने त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले, 

मात्र प्रकृती खालावत असल्याने त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोगर कोसळला आहे. राजू गायकवाड शेतीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सर्पतज्ज्ञांच्या माहितीनुसार साप चावण्याच्या खुणावरून नाग जातीचा साप असल्याचा अंदाज व्यक्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Ladki Bahin Yojana: सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० कधी येणार?

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, कोकणासह घाटमाथ्यावर कोसळणार जोरदार पाऊस

Success Story: त्सुनामित घर गेलं, शेतकऱ्याच्या लेकींनी जिद्दीने क्रॅक केली UPSC; एक IAS तर दुसरी IPS अधिकारी

SCROLL FOR NEXT