Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News: मुंबईमधील चोरीच्या सोन्याची तोंडापूरला विक्री; एकास अटक, एक फरार

Jalgaon News मुंबईमधील चोरीच्या सोन्याची तोंडापूरला विक्री; एकास अटक, एक फरार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुंबई येथे दरोडा टाकून चोरून आणलेली सोनसाखळी दोघांनी संगणमताने तोंडापूर येथील एका (Gold) सोने चांदी विक्रेत्याकडे अल्पदरात विक्री केली. गुरूवारी रात्री बारावाजेच्या हा प्रकार समोर आली. (Jalgaon) यानंतर पोलिसांनी एकास अटक केली आहे. (Tajya Batmya)

मांडवे बुद्रुक येथील भारत पांडुरंग लोखंडे (वय ३०) याने मुंबई येथून एका महिलेची सोनसाखळी चोरून मांडवे खुर्द येथील विनोद मराठे (वय ४७) यांच्याकडे दिली. मात्र हि माझीच आहे अशी माहिती दिल्याने दुकानदार यांना दोघांनी संगणमत करून त्या सोनसाखळीची तोंंडापूर येथील सोने चांदीच्या (Jamner) दुकानात जाऊन विक्री केली. दरंयान शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांनी पहुर पोलिसांच्या मदतीने सोनसाखळी चोरट्याला मांडवे बुद्रुक येथून रात्रीच ताब्यात घेतले. दुकानात जावून चौकशी केली असता विक्री करतांना सोबत असलेल्या मांडवे खुर्द येथील विनोद मराठे हे पोलिसांना तपास कामात सहकार्य न करता फरार असून तोंडापूर येथील सोने खरेदी करणाऱ्या अतुल काळे याच्याकडून साकळी जप्त केली. 

अतुल काळे यांच्याकडे अशा प्रकारचे चोरीचे सोने घेतल्याचे ही पाचवी वेळ असून तोंडापूर हे चोरीचे सोने घेण्याची केंद्र बनले आहे. बरेच चोरटे सोनं तसेच मोटरसायकली ची चोरी करून त्याची विल्हेवाट तोंडापूर येथूनच लावत असतात. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतेही कारवाई झालेली नाही. रात्रभर मुबंई पोलिसांनी काय कार्यवाही केली याची गुप्तता पाळण्यात आल्याने चोरून आणलेले सोने किती होते याची माहिती मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांनाही देण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुती आणि मविआला हादरा; राज्यात नव्या आघाडीची नांदी, कुणाला फायदा अन् फटका?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बँकेबाहेर दिसल्या भल्यामोठ्या रांगा

Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्ग

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

SCROLL FOR NEXT