Tuljabhavani Temple
Tuljabhavani TempleSaam tv

Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी देवीच्या मंदिरात पुरुषांना प्रवेश बंदी; नागपंचमीच्या दिवसासाठी हे आहे कारण

Dharashiv News तुळजाभवानी देवीच्या मंदिरात पुरुषांना प्रवेश बंदी; नागपंचमीच्या दिवसासाठी हे आहे कारण
Published on

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात नागपंचमी (Nagpanchami) निमित्त पुरुषांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. देवीच्या (Tuljabhavani Mandir) मंदिरात २१ ऑगस्टला सायंकाळी हा प्रवेश बंद असणार आहे. (Live Marathi News)

Tuljabhavani Temple
Kalyan News: इंस्टाग्रामवर ओळख, रेल्वे प्रवासादरम्यान मुलीला पळविले; ४८ तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असून याच दिवशी नागपंचमी आहे. दरवर्षी नागपंचमीनिमित्त सुहासिनी स्त्रीया मंदिरात नागपूजन, फेर व भूलई खेळतात. यामुळे मंदिरात महिलांची प्रचंड गर्दी होत असते. याच अनुषंगाने पूर्वापार वहिवाटीप्रमाणे पुरुषांना या कालावधीत मंदिरात प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून ही माहिती देण्यात आली आहे.

Tuljabhavani Temple
Ekburji Dam: वाशीम शहराला पाणी टंचाईची शक्यता; एकबुर्जी धरण ८० टक्के पाणीसाठा

सायंकाळी एक तास बंदी 
मंदिर संस्थानने घेतलेल्या निर्णयानुसार नागपंचमी अर्थात २१ ऑगस्टला पुरुषांना मंदिरात प्रवेश बंदी केली आहे. दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत पुरुषांना मंदिरात राहणार प्रवेश बंद राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com