मनोज जयस्वाल
वाशीम : पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला. मात्र, वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण क्षेत्र परिसरात आणखी ही जोरदार (Rain) पाऊस न झाल्याने धरण केवळ ८० टक्केच भरले आहे. त्यामुळे पुढे पाऊस न पडल्यास (Washim) वाशिम शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. (Latest Marathi News)
एकबुर्जी धरण हे मातीचे धरण असून या धरणाची निर्मिती १९६५ दरम्यान करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या २५ हजार होती. आज वाशिम शहराची लोकसंख्या सव्वा लाखाच्या जवळपास आहे. सोबतच या धरणातील शेती सिंचनासाठी ५५ टक्के पाणीसाठा राखीव ठेवला जातो. हे धरण ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात १०० टक्के भरल्यानंतरही मे महिन्यात दहा ते बारा दिवसआड पाणी पुरवठा केला जातो.
यंदा पावसाळ्याचा अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु धारण पाणलोट क्षेत्रात हवा तसा पाऊस झाला नसल्याने धरणातील पाणीसाठा अद्याप वाढलेला नाही. त्यामुळे पाऊस न पडल्यास वाशीम शहराला पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.