चेतन व्यास
वर्धा : तुमच्या पार्सलमध्ये सहा किलो कापड, पाच पासपोर्ट, सहा क्रेडिट कार्ड आणि १४० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज सापडले असून सायबर पोलिसांशी (Cyber Police) बोला, अशी भीती दाखवून तसेच धमकावून महिलेकडून दाेन लाख ४७ हजार ७७६ रुपये उकळत फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर पोलिस ठाण्यातील (Wardha) कर्मचाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. अंबादास जनार्धन कांबळे (३५ रा. विष्णूनगर नांदेड), अनिल संभाजी निकम (४९ रा. द्वारकाधीशनगर, संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. (Maharashtra News)
१० ऑगस्ट रोजी महिला घरी असताना तिच्या मोबाइलवर अज्ञाताने फोन करून तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडले असून सायबर पोलिसांशी बोला. असे म्हणत भीती दाखवून व धमकावून महिलेला विविध कारणे सांगून खात्यातून एकूण दाेन लाख ४७ हजार ७७६ रुपयांनी फसवणूक केली. (Crime News) याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास केला असता आरोपी नांदेड व संभाजीनगर येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशान्वये पोलिस पथकांनी नांदेड व संभाजीनगर गाठून आरोपींना बेड्या ठोकल्या.
सायबर पोलिसांचे पथक नांदेड येथे जात आरोपी अंबादास कांबळे याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आरोपी अनिल निकम (रा. औरंगाबाद) हा देखील गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले. पथकाने औरंगाबाद गाठून त्यास अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले बॅंक खात्याचे एक चेकबुक, दाेन मोबाइल, सात एटीएम कार्ड असा २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.सायबर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींच्या बॅंक खात्याची तपासणी करून निरीक्षण केले असता त्यांच्या खात्यात कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपींकडून महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघड येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.