Jamner Accident Saam tv
महाराष्ट्र

Jamner Accident : कामावरून घरी जाताना मृत्यूने गाठले; दुचाकीसमोर कुत्रा आल्याने झाला अपघात

Jalgaon News : दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास कामावरून घरी परत जात असताना त्याच्या दुचाकींचा अपघात झाला

Rajesh Sonwane


जळगाव : जळगावहून ड्युटी आटोपल्यानंतर सायंकाळी घरी जाताना दुचाकीसमोर कुत्रा अचानक आडवा आला. यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सदरची घटना नेरी गावाजवळ घडली. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जामनेर (Jamner) तालुक्यातील पहूर येथील गणेश ज्ञानेश्वर बनकर (वय २७) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पहूर कसबे येथून गणेश हा जळगाव येथे एका गॅस एजन्सीला कामाला आहे. तो रोज दुचाकीने ये- जा करत होता. दरम्यान ३१ जुलैला नेहमीप्रमाणे सकाळी घरून दुचाकीने जळगावला (Jalgaon) कामावर आला होता. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास कामावरून घरी परत जात असताना त्याच्या दुचाकींचा अपघात झाला. 

सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महामार्गावर नेरी येथे जामनेर फाट्याजवळ पोहचला असताना दुचाकीच्या समोर अचानक कुत्रा आडवा आला. यामुळे दुचाकीला (Accident News) अपघात झाला. यात गणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला लागलीच जळगाव येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. गणेशचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT