Jamner Accident Saam tv
महाराष्ट्र

Jamner Accident : बंद पडलेल्या मालवाहू गाडीला दुचाकी मागून धडकली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एकजण जखमी

Jalgaon News : तोंडापूर येथील माहवाहु बोलोरो पिकअप हि गाडी फर्दापुरकडून येत असतांना वरखेडी गावाच्या पुढे उतारावर बंद पडली.

Rajesh Sonwane

तोंडापूर (जळगाव) : जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथून जवळच असलेल्या फर्दापूरहून कुंभारी बुद्रुक येथे येत असताना रस्त्यावर बंद पडलेल्या मालवाहू गाडीला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघं तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

जामनेर (Jamner) तालुक्यातील कुंभारी बु. येथील पितांबर डिगंबर जोशी (वय २८) व बापु रविंद्र गोपाळ (वय २७) असे अपघातात मृत झालेल्या तरुणांची नवे आहेत. तर शुभम गोपाळ हा गंभीर जखमी आहे. दरम्यान तोंडापूर येथील माहवाहु बोलोरो पिकअप हि गाडी फर्दापुरकडून येत असतांना वरखेडी गावाच्या पुढे उतारावर बंद पडली. त्याच्या मागे येत असलेल्या दुचाकीवर प्रशांत रवींद्र गोपाळ, पितांबर जोशी व शुभम जयेंद्र गोपाळ हे तिघेजण कुंभारीला येत होते. पिकअप बंद पडल्याने मागून वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार (Accident) धडक दिली. यात प्रशांत गोपाळ हा जागीच तर पीतांबर जोशी याला जळगाव येत उपचारासाठी नेत असतांना दगावला तिसरा शुभम गोपाळ जबर जखमी असल्याने याला गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातांची माहिती मिळाल्याने गावातील ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात प्रशांत गोपाळ व पीतांबर जोशी याच्या मृत्यूची बातमी गावात पसरल्याने गावात शोककळा पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही तरुणांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. पीतांबर जोशी याला तिन मुली, पत्नी असून प्रशांत गोपाळ याला एक मुलगा, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT