Erandol Accident : अंत्यविधीवरून परतताना भीषण अपघात; पती पत्नीचा जागीच मृत्यू

Jalgaon News : चाळीसगाव येथे शिक्षक असलेले अविनाश पाटील हे पत्नी मीनाबाई यांच्यासह पिंपळकोठा (ता. एरंडोल) येथे मोटारसायकलने नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते.
Erandol Accident
Erandol AccidentSaam tv
Published On

एरंडोल (जळगाव) : अंत्यविधीवरून परतत असताना दाम्पत्यावर काळाने घाला घातले. एरंडोलजवळ झालेल्या या अपघातात भरधाव जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Erandol Accident
Parbhani News : औषधी व्यावसायिकाला धमकी देत मागितली खंडणी; तिघे पोलिसांच्या ताब्यात

एरंडोलजवळ (Erandol) महामार्गावर १६ ऑगस्टच्या दिवशी घडला असून अविनाश विजयसिंग पाटील (वय ५५) व मीना अविनाश पाटील (वय ४८) अशी मृत पती- पत्नीचे नाव आहे. चाळीसगाव येथे शिक्षक असलेले अविनाश पाटील हे पत्नी मीनाबाई यांच्यासह पिंपळकोठा (ता. एरंडोल) येथे मोटारसायकलने नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी झाल्यानंतर पाटील पत्नीसह चाळीसगाव येथे जात होते. मात्र, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास वाचविण्याचा प्रयत्नात (Jalgaon) जळगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अविनाश पाटील व त्यांच्या पत्नी जागीच ठार झाल्या. 

Erandol Accident
Gondia News : गोंदिया विधानसभेतून महिलांनी पाठवल्या मुख्यमंत्र्यांना राख्या; राखी प्रमाणे दिवाळीला ओवळणीत भेट देण्याची अपेक्षा

पिंपळकोठा येथून अंत्यविधी आटोपून घराकडे जात असताना केवळ सहा किलोमीटर अंतरावर हा अपघात (Accident) झाला. केवळ अर्ध्या तासापूर्वीच सर्व नातेवाईकांना भेटून घराकडे जात असलेल्या अविनाश पाटील यांचा पत्नीसह अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच परिवारातील सदस्यांना मोठा धक्का बसला. अविनाश पाटील हे निमगाव (ता. यावल) येथील मूळ रहिवासी असून, नोकरीनिमित्त ते चाळीसगाव येथे राहत होते. त्यांच्या पत्नी मीना पाटील ह्या चाळीसगाव येथे पाळणाघर चालवत होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच पाटील यांच्या नातेवाईकांनी अपघातस्थळी व रुग्णालयात गर्दी केली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com