Dombivali News : डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या अभिनंदनासाठी फिल्मी स्टाईल बॅनरची चर्चा

Dombivali News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत
Dombivali News
Dombivali NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि केडीएमसीतील २७ गावातील पाणी, मालमत्ता कर, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबाबत डोंबिवली शिवसेना शहर शाखेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनासाठी बॅनर लावण्यात आले आहे. शहरभर फिल्मी स्टाईल लावण्यात आलेल्या या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे. 

Dombivali News
Gondia News : गोंदिया विधानसभेतून महिलांनी पाठवल्या मुख्यमंत्र्यांना राख्या; राखी प्रमाणे दिवाळीला ओवळणीत भेट देण्याची अपेक्षा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. कल्याण ग्रामीण आणि (Dombivali) डोंबिवली शहरातील सुमारे ४० हजार महिलांना याचा लाभ मिळाला आहे. रक्षाबंधननिमित्त डोंबिवली शिवसेना शाखेत शेकडो महिलांनी मुख्यमंत्री शिंदे यांना राखी बांधत त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी महिलांनी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद जल्लोष साजरा केला. तसेच केडीएमसी लगतच्या २७ गावांतील विविध समस्यांबाबत खासदार श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बैठक घेतली. या बैठकीत 27 गावातील पाणी समस्या, मालमत्ता कराचा प्रश्न, 27 गावातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न, मूलभूत सोयी सुविधांचा प्रश्नांबाबतच्या या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत.

Dombivali News
Erandol Accident : अंत्यविधीवरून परतताना भीषण अपघात; पती पत्नीचा जागीच मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे २७ गावातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेने फिल्मी स्टाईल अनोखा बॅनर लावला आहे. यात "एकनाथ शिंदे ने एक बार कमिटमेंट कर दे तो अपनी आप की भी नहीं सूनता" अशा आशयाचा फिल्मी डायलॉग लिहलेला या बॅनरची संपूर्ण शहरात चर्चा रंगली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com