Jamner Accident Saam tv
महाराष्ट्र

Jamner Accident : भरधाव डंपरने तरुणाला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा मृतदेहासह रास्ता रोको

Jalgaon News : भरधाव डंपरने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

संजय महाजन

जळगाव : रस्ते अपघातात वाढ झाली असून रोज कुठे ना कुठे अपघात होऊन अनेकांचा बळी जात आहे. यात रेतीची वाहतूक करणाऱ्या डंपर भरधाव वेगाने नेली जात असल्याने यातून अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. अशीच घटना जामनेर तालुक्यातील नेरी गावाजवळ घडली असून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने तरुणाला धडक देत चिरडले आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी येथील चौफुलीवर रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. गजानन पाटील असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास नेरी येथील गजानन पाटील याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोरदार धडक देत उडविले. यात गजानन हा रस्त्यावर फेकला गेला असता त्याच्या अंगावरून डंपर गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको 

दरम्यान भरधाव डंपरने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान घटनेनंतर नेरी दिगर येथील संतप्त ग्रामस्थांनी गजानन याचा मृतदेह नेरी येथील चौफुलीवर आणला. यानंतर मृतदेह रस्त्यावर ठेवून याठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. दोन तास ठिय्या आंदोलन करत प्रशासनावर रोष व्यक्त केला. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. 

डंपर चालक फरार 

स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. अवैध वाळु वाहतुकीकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करते आहे. प्रशासनाच्या बेजबाबदार प्रशासनामुळेच बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान सदरचे डंपर भरत राजपूत चालवत होता. अपघातानंतर तो पसार झाला. पोलिस व ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला वावदडा येथून पकडले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT