Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

दुर्दैवी घटना! ५ दिवसांवर होतं लग्न, नवऱ्यामुलाचा विहिरीत पडून मृत्यू

आनंदी परिवार दुःखाच्‍या खाईत; पाच दिवसांवर विवाह, मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

एरंडोल (जळगाव) : विवाहाला केवळ पाच दिवस बाकी असतांना नियोजित वराचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. वराच्या अचानक मृत्यूमुळे परिवारासह मित्रमंडळीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. (jalgaon erandol news Five days after the marriage young man fell into a well and died)

एरंडोल येथील (Jalgaon News) महात्मा फुले पुतळा परिसरातील रहिवासी संजय विठ्ठल महाजन यांचा मोठा मुलगा भावेश संजय महाजन (वय २५) याचा विवाह २५ एप्रिलला होणार होता. घरातील मोठ्या मुलाचा विवाह असल्यामुळे संजय महाजन व त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण होते. विवाहाची तयारी वेगाने सुरु होती. नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधव यांना लग्न पत्रिकांचे वाटप देखील करण्यात आले होते.

नाश्‍त्‍यासाठी गेला तो आलाच नाही

घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना आज सकाळी नियोजित वर भावेश संजय महाजन हा काका ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन यांच्या घरी गेला आणि तुमची मोटरसायकल द्या मी नाश्ता करायला जात आहे; असे सांगून गेला होता. बराच वेळ झाल्यानंतर देखील भावेश मोटरसायकल घेवून न आल्यामुळे ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो अद्याप घरी आला नसल्याचे त्याच्या आई वडिलांनी सांगितले. काही वेळानंतर भावेशचे भाऊ राकेश आणि मनोज यांनी ज्ञानेश्वर महाजन यांनी मोबाईल करून भावेश हा धरणगाव रस्त्यावरील त्याच्या शेताच्या जवळ असलेल्या सुनील पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडला असून त्याचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर महाजन हे त्यांचे नातेवाईक गजानन माळी यांच्यासह शेतात गेले असता भावेश यास परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने विहिरीबाहेर काढले आणि त्यास ग्रामीण रुग्णालयात (Hospital) नेले असता तो मयात झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.

क्षणार्धात परिवाराचा आनंद हिरावला

पाच दिवसानंतर मोठ्या मुलाचा विवाह असल्यामुळे संजय महाजन आणि त्यांच्या परिवारातील सदस्य आनंदात होते. विवाहाची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र नियतीने काही क्षणातच महाजन परिवाराचा आनंद हिसकावून घेतला आणि सर्व परिवाराला दुखा:च्या खाईत लोटून दिले.याबाबत ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT