Erandol Accident Saam tv
महाराष्ट्र

Erandol Accident : लग्नाचे कपडे खरेदी करून परतताना काळाचा घाला; पायी जात असताना टँकरची धडक, चालकाचाही मृत्यू

Jalgaon News : जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव जाणाऱ्या टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाक्यावरील एका सिमेंट व आसारीच्या दुकानावर टँकर धडकला

Rajesh Sonwane

एरंडोल (जळगाव) : घरात लग्न सोहळा असल्याने कपडे खरेदी करून घरी परतला होता. परिवारातील सदस्यांना दुचाकीने घरी रवाना केल्यानंतर आईसमवेत रस्त्याने पायी जात असताना जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव जात असलेल्या टँकर धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात टँकर चालकासह या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. 

जळगावकडून (Jalgaon) पारोळ्याकडे भरधाव जाणाऱ्या टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाक्यावरील एका सिमेंट व आसारीच्या दुकानावर टँकर धडकला. या (Accident) अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला. तर रस्त्याने आईसोबत चालत असलेला तरुण शकील अ. नबी बागवान (वय ३५) गंभीर जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 

गर्दी दिसल्याने भाऊ थांबला 

दरम्यान शकीलची आई, भाऊ व वहिनी हे घरात विवाह असल्याने मालेगाव येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास ते एरंडोल बसस्थानकावर उतरले. रिक्षा नसल्याने शकील बागवान याने भाऊ आसिफ नबी तांबोळी यास दुचाकी घेऊन येण्यास सांगितले. आसिफ दुचाकी घेऊन आला व दुचाकीवरून आसिफ व त्याची पत्नी घरी गेले. तर शकील बागवान हा त्याच्या आईसोबत पायी घरी जात होता. आसिफने पत्नीला घरी सोडल्यानंतर आई व भावास घेण्यासाठी येत असताना त्यास नाक्याजवळ नागरिकांची गर्दी दिसल्याने तो थांबला व जवळ जाऊन पाहिले असता, त्याच्या भावाचा अपघात झाल्याचे दिसले. 

अपघातात शकील बागवान याच्या दोन्ही पायावरून टँकर गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, टँकरचा अपघात होताच जोरदार आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करून जखमी शकील यास बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका व पोलिसांना माहिती दिली. अपघातग्रस्त टँकर एका झाडाला धडकल्यामुळे तसेच लोखंडी आसाऱ्यांमध्ये अडकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत आसिफ नबी तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिस ठाण्यात टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra Bus Accident : अमर यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

SCROLL FOR NEXT