jalgaon eknath shinde shiv sena branch ghost rumors  Saam Tv News
महाराष्ट्र

Shiv Sena Jalgaon News : शिंदे सेनेच्या कार्यालयात भूत, कार्यकर्ते फिरकेनात; खुद्द मंत्री पुढे येऊन म्हणाले...

Eknath Shinde Shivesena Jalgaon News : जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भव्य कार्यालय तयार करण्यात आले होते. मात्र निवडणुका होऊन अनेक महिने झाले असले तरी कार्यालयाचे उद्घाटन अजून झालेलं नाही.

Prashant Patil

जळगाव : जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भव्य कार्यालय तयार करण्यात आले होते. मात्र निवडणुका होऊन अनेक महिने झाले असले तरी कार्यालयाचे उद्घाटन अजून झालेलं नाही. तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते देखील या कार्यालयाकडे फिरकत नसल्याचं समोर आलं आहे. याचं कारण म्हणजे या कार्यालयात भूत असल्याच्या अफवेमुळे आता कार्यकर्तेच कार्यालयात जायला नकार देत आहे. त्यामुळे शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकत्याच पदाधिकाऱ्यांना सांगितलं की, चार जूननंतर मीच या कार्यालयात बसणार, तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका. या कार्यालयाचं चार जूननंतर मोठ्या थाटामाटात उद्घाटन होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हे कार्यालय उभारण्यात येत आहे. जवळपास पूर्णत्वास आलेल्या या इमारतीचं उद्घाटन ४ जून रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भूत असल्याच्या चर्चेमुळे काही कार्यकर्त्यांनी या कार्यालयापासून स्वत:ला दूर ठेवलं असल्याचं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे, या चर्चेला अधिक उधाण आले ते राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका भाषणामुळे. भाषणादरम्यान त्यांनी खुद्द या अफवेचा उल्लेख केला आणि कार्यकर्त्यांमध्ये भुताच्या अफवेनं भीती पसरल्याचं सांगितलं. तथापि, 'ही अफवा असून, कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये. मी स्वतः या कार्यालयात नियमित बसणार आहे,' असंही त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.

ज्या ठिकाणी हे कार्यालय तयार करण्यात आलेलं आहे त्याठिकाणी भूत बंगला असल्याची चर्चा होती. कारण अनेक वर्ष ती जागा पडीक होती. मात्र त्या ठिकाणी मोठी इमारत बांधली गेली असून शिवसेनेचे मोठे मध्यवर्ती कार्यालय देखील तयार करण्यात आलेलं आहे. लवकरच त्या कार्यालयाचं उद्घाटन होणार असून आम्ही सर्व शिवसैनिक तिथून आमचं पुढील काम सुरू करणार असल्याची माहिती शिंदे यांच्या सेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली आहे. तर भूत बंगल्याच्या अफवा असताना शिवसैनिकांनी त्याठिकाणी कार्यालय तयार केलं असून लवकरच त्याचं उद्घाटन करून आम्ही काम सुरू करणार असल्याची माहिती शिंदे सेनेच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक सरिता माळी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT