जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गडखांब येथे एका भरधाव बसने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने लता मुरलीधर पाटील या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर त्यांचे पती मुरलीधर पाटील गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना मुरलीधर पाटील व त्यांच्या पत्नी लता पाटील हे दहिवद शिवारातील शेतात जाण्यासाठी मोटरसायकलवरून जाताना घडली.
चोपडा येथून अमळनेरकडे येणाऱ्या यावल आगाराच्या एमएच २० बीएल २६५६ क्रमांकाच्या एसटी बसने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीसह दोघांनाही बसने जवळपास ५० ते ६० फूट फरफटत नेलं. या धडकेत लता पाटील गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती मुरलीधर पाटील हे देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर अमळनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताविषयी दहिवद गावाचे स्थानिक तरुण नितीन सोनवणे यांनी माहिती दिली. ते सकाळी त्या दिशेला फिरायला गेले असता, त्यांच्या डोळ्यासमोर हा अपघात झाला.
हिंगोलीत शेतकऱ्यासह बैलाचा मृत्यू
दरम्यान, हिंगोलीच्या वसमतमध्ये शेतकऱ्याच्या बैलगाडीचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने बैलगाडीला जोरदार धडक दिली. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव-निळा मार्गावर ही सदरची घटना घडली आहे. या अपघातात पंडितराव मुळे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे पंडितराव मुळे हे सकाळी शेतकरी शेतात कामासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आकाश मुळे व बळीराम गच्छे असे तिघेजण मिळून गावाकडून निळा रोडने शेताकडे बैलगाडीत बसून शेतीच्या कामकाजासाठी निघाले होते. याच वेळी हि दुर्घटना घडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.