Dharangaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Dharangaon Accident : मित्राच्या वाढदिवसाचा केक आणायला जाताना मृत्यूने गाठले; दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात

Jalgaon News : एकुलत्या एक मुलाच्या मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. तर मित्राच्या वाढदिवसाचा केक आणायला गेला अन्‌ कायमचा निघून गेला म्हणून त्याची मित्रमंडळीही हुंदके देत रडत होते.

Rajesh Sonwane

जळगाव : मित्राचा वाढदिवस असल्याने त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचे नियोजन मित्रांनी मिळून ठरविले. रात्री केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी केक घेण्यासाठी दुचाकीने जात असताना घाट झाला. केक घेण्यापूर्वीच अपघात होऊन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील गारखेडा रस्त्यावर घडली. तर सोबतचे मित्र जखमी झाले आहेत. 

धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील प्रथमेश सुधाकर पाटील (वय १५) असे अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. सदर अपघात १६ डिसेम्बरला सायंकाळी सातला दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता. यात प्रथमेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. तर मित्राच्या वाढदिवसाचा केक आणायला गेला अन्‌ कायमचा निघून गेला म्हणून त्याची मित्रमंडळीही हुंदके देत रडत होते. 

समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक  
गारखेडा (ता. धरणगाव) प्रथमेश पाटील हा आपल्या आई- वडिलासंह गावात वास्तव्याला होता. मित्राचा वाढदिवस असल्याने प्रथमेश हा वैभव विठ्ठल देशमुख, हितेश भगवान भोई, शिवराज पंकज पाटील असे सोबत शिकणारे चौघे मित्र धरणगाव येथे केक घेण्यासाठी सायंकाळी सातला दुचाकीने धरणगावकडे निघाले होते. दरम्यान धरणगाव ते गारखेडा रस्त्यावरून जात असताना समोरून येणारी दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

सहाजण झाले जखमी 
दुचाकींच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात प्रथमेशसह त्यांचे चौघे मित्र आणि समोरील दुचाकीवरील शेखर महाजन तसेच गायत्री महाजन हे भाऊ- बहीण जखमी झाले. यातील प्रथमेश पाटील हा गंभीर जखमी झाल्याने त्याला जळगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. प्रथमेशचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच मित्रमंडळींनीही धाव घेत रुग्णालयात गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT