Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : उभ्या ट्रॅक्टरला बसची धडक; एकाचा जागीच मृत्यू, २१ प्रवासी जखमी

Jalgaon News : बसस्थानकातून निघाल्यानंतर पंधरा मिनिटांच्या अंतरावर पोहचल्यावर चोपडा मार्गावर धरणगाव शहरापासून काही अंतरावरच असलेल्या पिंपळे फाट्याजवळ ट्रॉलीसह उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला बसने मागून जोरदार धडक

Rajesh Sonwane

धरणगाव (जळगाव) : धरणगाव येथून मार्गस्थ झालेल्या जळगाव- शिरपूर बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील २१ प्रवासी जखमी झाले आहेत. तर बस चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सदर अपघात १४ डिसेंबरला सकाळी धरणगाव- चोपडा मार्गावरील पिंपळे फाट्याजवळ झाला.


राज्य परिवहन महामंडळाची जळगाव- शिरपूर बस धरणगाव बसस्थानकावरून मार्गस्थ झाली. बसस्थानकातून निघाल्यानंतर पंधरा मिनिटांच्या अंतरावर पोहचल्यावर चोपडा मार्गावर धरणगाव शहरापासून काही अंतरावरच असलेल्या पिंपळे फाट्याजवळ ट्रॉलीसह उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला बसने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात बसचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला, तर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. 

सदरच्या अपघातात पाळधी (ता. धरणगाव) येथून चोपडा येथे रोज ये- जा करणारे प्राथमिक शिक्षक तामराज शरद सोनवणे (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला. सोनवणे हे चोपडा येथील प्रताप प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तर बसचा समोरच्या भाग चेपला गेल्याने यात चालक गंभीर जखमी झाले असून बस चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

जखमींना रुग्णालयात केले दाखल 
सदर अपघातात २१ प्रवासी जखमी असून, अपघातातील सर्व जखमींना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. जळगाव येथून बसलेल्या काही प्रवाशांनी बसचालक भरधाव बस चालवीत असल्याचे सांगितले. अपघातानंतर खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 : दिवाळीला कुछ तो मीठा हो जाये; घरीच झटपट बनवा ४ मिठाई

Saam Impact: 'Saam TV' च्या बातमीचा दणका ! नवी मुंबईतील ड्रायफ्रूट कंपनीवर मोठी कारवाई|VIDEO

Accident News : दिवाळीत शोककळा! यात्रेवरून येताना ९ भाविकांचा मृत्यू, 11 जणांची प्रकृती चिंताजनक

GK: सूर्याचा मूळ रंग कोणता? लाल, पिवळा की नारंगी...जाणून घ्या माहिती

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोन खरेदी करण्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT