Cyber crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber crime : अँप डाउनलोड करताच बँक खाते रिकामे; तरुणाची ७ लाख ३० हजार रुपयात फसवणूक

Jalgaon News : २ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान त्यांच्या मोबाईलवर एस.एम. आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या एका महिलेने मोहम्मद तेली यांच्याशी व्हाट्सअँप आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला

Rajesh Sonwane

जळगाव : ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मोबाईलवर संपर्क करून वेगवेगळे आमिष दाखवत फसवणूक करण्यात येत असते. त्यानुसार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून संबंधितास मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. हे अँप डाउनलोड करताच बँक खात्यातील ७ लाख ३० हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक करण्यात आली. 

जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात मोहम्मद इमरान हानिफ तेली या तरुणाची फसवणूक झाली आहे. मोहम्मद हा मार्केटींगचे काम करून उदरनिर्वाह करतो. दरम्यान २ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान त्यांच्या मोबाईलवर एस.एम. आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या एका महिलेने मोहम्मद तेली यांच्याशी व्हाट्सअँप आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना स्टॉक मार्केटची माहिती देऊन त्या संबंधिचे अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. 

अँप डाउनलोड करताच रक्कम काढली 

मोहम्मद याला स्टॉक मार्केटशी संबंधित अँप डाऊनलोड करायला सांगितल्याने प्ले स्टोर वरून सदरचे अँप डाऊनलोड केले. अँप डाऊनलोड करताच या तरूणाच्या बँक खात्यातून वेळोवेळी तब्बल ७ लाख ३० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

सायबर पोलिसात तक्रार 

दरम्यान या प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून १ फेब्रुवारीला जळगाव सायबर पोलीस ठाण्यात एस.एम. आर्या आनंद असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे हे करीत आहे. नागरिकांनी ऑनलाइन फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT