Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News : जळगाव पुन्हा हादरले; भररस्त्यात गाठून तरुणाची हत्या

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. यात जळगाव शहरात पुन्हा एकदा हत्येची घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संजय महाजन

जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून मागील काही दिवसात सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. अशात पहाटेच्या सुमारास एका तरुणाला भर रस्त्यात गाठून त्याच्यावर हल्ला करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील विशाल रमेश मोची (वय २६) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास बेंडाळे चौकातील महावितरण कार्यालाजवळ हि थरारक घटना घडली आहे. हत्येची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वाढत्या गुन्हेगारीला चाप बसावा अशी मागणी होत आहे.   

धारदार शस्त्राने केला हल्ला 

दरम्यान विशाल मोची हा पहाटे तीन वाजेच्या सुमारास बेंडाळे चौक परिसरात गेलेला असताना त्याच्यावर ६ ते ७ अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला. काही समजण्याच्या आत धारदार शस्त्रांने वार केल्याने विशाल हा जागीच कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.  

पोलिसांकडून तपास सुरु 

घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र विशालची हत्या नेमक्या कुठल्या कारणामुळे झाली, याचा शोध पोलीस सध्या घेत असून हल्लेखोरांचा देखील तपास केला जात आहे. दरम्यान विशालच्या पश्चात आई- वडील, लहान भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही; एकनाथ शिंदे यांचं आश्वासन|VIDEO

Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

Kalyan: कामावर गेला पण परत आलाच नाही, हाय टेन्शन वायरला स्पर्श; विजेचा झटका लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

SCROLL FOR NEXT