Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : सोशल मिडियावर ओळख; लग्नाचे आमिष देत विवाहितेवर अत्याचार

Jalgaon News : जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात २३ वर्षीय महिला वास्तव्याला आहे. सदर महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती मुलांसोबत वास्तव्यास होती.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर महिलेची ओळख एका तरुणाशी झाली. या ओळखीतून तरुणाने महिलेशी जवळीक साधत तिच्यासोबत लग्न करण्याचा शब्द देत अत्याचार केल्याची घटना (Jalgaon) जळगावात समोर आली आहे. महिलेने लग्नाचे विचारल्यानंतर सदर तरुण हा फरार झाला होता. यानंतर पीडित महिलेने (Police) पोलिसात तक्रार दिल्याने तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात २३ वर्षीय महिला वास्तव्याला आहे. सदर महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती मुलांसोबत वास्तव्यास होती. याचा दरम्यान महिलेची ओळख जळगावातीलच विकास प्रकाश अडकमोल याच्याशी झाली. (Crime News) यानंतर विकासने महिलेसोबत ओळख अधिक वाढवत तिला भेटू लागला. तसेच त्याने घर भाड्याने घेत महिलेसोबत राहू लागला.

याच दरम्यान त्याने सदर महिलेला लग्नाने आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. परंतु महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरवात केली. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पीडित महिलेने पोलिसात धाव घेत फिर्यादी देत एमआयडीसी पोलिस ठाण्यात विकास याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी विकासला गेंदालाल मिल परिसरातून ताब्यात घेत जिल्‍हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली.सहाय्यक पोलिस निरीक्षक दयानंद सरवदे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar setback : अजित पवारांना जोरदार धक्का, ४३ पदाधिकार्‍यांचा एकच वेळी 'जय महाराष्ट्र', निवडणुकीआधी राष्ट्रवादीला खिंडार

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला मंजूरी तर मिळाली, पण कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख वाचा

Election News : राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका? पुढील आठवड्यात बिगुल वाजणार ? | VIDEO

Airtel Cheapest Plan: घरात Wifi आहे? मग 'हा' एअरटेल प्लॅन तुमच्यासाठी आहे सर्वोत्तम, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

SCROLL FOR NEXT