Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : जळगाव एमआयडीसीतील कंपनीतच केला हात साफ; तीन लाखांची रोकड लांबविली, चोरटे सीसीटीव्हीत कैद

Jalgaon News : २२ फेब्रुवारीला मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीची दरवाजे तोडून प्रवेश केला. त्यानंतर ऑफीसमधील ड्रॉवर तोडून त्यात ठेवलेले ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेली

संजय महाजन

जळगाव : जळगावच्या एमआयडीसीतील ई- सेक्टरमधील ग्रीन एन इको सोल्युशन कंपनीतून अज्ञात तीन चोरट्यांनी कार्यालयात चोरी केल्याची घटना समोर आली आहे. यात कार्यालयात ठेवलेली तीन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

जळगाव शहराला लागून असलेल्या एमआयडीसी परिसरात नेहमीच लहान- मोठ्या चोऱ्या होत असतात. दरम्यान जिग्नेश शरद शेठ यांची एमआयडीसीच्या ई सेक्टरमध्ये ग्रीन एन इको सोल्युशन नावाची कंपनी आहे. दरम्यान शनिवारी एमआयडिसीतील सर्व कंपन्या बंद असतात. याचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास जिग्नेश शेठ यांच्या कंपनीच्या कार्यालयातून रोकड घेऊन चोरटे पसार झाले आहेत. 

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

२२ फेब्रुवारीला मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीची दरवाजे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ऑफीसमधील ड्रॉवर तोडून त्यात ठेवलेले ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीत आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. यानंतर कंपनीतील सीसीटीव्ही चेक केले असता हा सर्व प्रकार कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. 

पोलिसात तक्रार दाखल 

दरम्यान हा प्रकार उघडकीला आल्यानंतर कंपनीचे मालक जिग्नेश शरद शेठ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज घेऊन या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods To Avoid At Night: रात्री चुकूनही 'हे' ५ पदार्थ खाऊ नका, शरीरासाठी ठरू शकतात घातक

Maharashtra Live News Update:छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Beed : टॉवर कोसळला अन् डाव मोडला; चोरी करताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

Shampoo Free Hair Wash Tips: शॅम्पू विसरा, केस धुण्यासाठी घरगुती या 5 गोष्टी वापरा, केस होतील लांब आणि दाट

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे थेट CM फडणवीसांच्या भेटीला; सस्पेन्स वाढला, VIDEO

SCROLL FOR NEXT