Jalgaon Crime news Saam tv news
महाराष्ट्र

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटातील नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात आयुष्य संपवलं

Shiv Sena Leader Found Dead at Home: शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अनंत जोशी यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ओंकारेश्वर मंदिर परिसरातील घरात गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं.

Bhagyashree Kamble

  • शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अनंत जोशी यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.

  • ओंकारेश्वर मंदिर परिसरातील घरात गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं.

  • आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.

  • त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळात हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे.

राजकीय वर्तुळातून खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. ओंकारेश्ववर मंदिर परिसरात असलेल्या राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. याची माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी अनंत जोशी यांना तात्काळ रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून, त्यांनी आयुष्य का संपवलं? याचा तपास सुरू आहे.

अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना गटाचे नगरसेवक यासह महापालिकेचे गटनेतेही होते. १० दिवसांपूर्वी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर त्यांनी राहत्या घरात टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांसह विविध पक्षातील नेत्यांनी, पदाधिकांऱ्यांनी रूग्णालयात जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं.

'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

घटनेच्या दिवशी ते घरातच होते. मात्र, त्यांनी राहत्या घरात आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी अनंत जोशी यांना रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. दरम्यान, आत्महत्या करण्यामागचं कारण अस्पष्ट आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनंत जोशी कोणत्या तरी कारणावरून विवंचनेत होते. मात्र, टोकाचं पाऊल उचलतील, असं वाटलं नव्हतं, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लढ्ढा यांनी दिली आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची विजयी एक्स्प्रेस सुसाट! 'या' महापालिकेत 5 उमेदवार बिनविरोध | VIDEO

Maharashtra Politics: भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, वाहनांची तोडफोड अन्...; शिंदेसेनेच्या नेत्यावर आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजित पवारांच्या विरोधात बॅनरबाजी...

Red Saree Designs: लग्नात नेसा लाल रंगाची साडी, या आहेत 5 ट्रेडिंग डिझाईन्स, नवरीचं सौंदर्य येईल खुलून

Beetroot Dosa Recipe : हेल्दी आणि कुरकुरीत बीट रवा डोसा, लहान मुले आवडीने खातील; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT