Crime News Saam tv
महाराष्ट्र

कौटुंबिक वादातून एकाचा खून; पत्नी, मुले ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : पाचोरा येथील भास्करनगर भागात ४६ वर्षीय इसमाचा पत्नी व मुलांनी संगनमताने खून केल्याची घटना रविवारी (ता. १०) उघडकीस आली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. खुनामागील कारणांचा पोलिस (Police) शोध घेत आहेत. (jalgaon crime news pachora Murder of one in a family dispute)

भास्करनगरात संजय खेडकर हे वास्तव्यास असून, त्यांना प्रतीक व रोहित ही दोन मुले आहेत. संजय खेडकर काहीही कामधंदा करीत नव्हते. ते सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. या कारणावरून घरात नेहमीच वाद (Crime News) होत होते. दोन्ही मुलांना देखील ते लहानसहान गोष्टीवरून बोलत असत. अपमानास्पद वागणूक देत असत. त्यामुळे वडिलांबाबत दोन्ही मुले व त्यांच्या आईच्या मनात रोष वाढत गेला.

शनिवारी रात्री कुटुंबात वाद

शनिवारी (ता. ९) रात्री खेडकर कुटुंबीयांत वाद झाला. रविवारी (ता. १०) सकाळी पुन्हा वाद उकरून काढण्यात आला. त्या वादात संगनमताने संजय खेडकर यांच्या डोक्यावर व शरीरावर हत्याराने वार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली व तपास चक्रे फिरवली असता हत्येसंदर्भात वरीलप्रमाणे माहिती मिळाल्याने मृताच्या पत्नीसह दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे (Pachora News) शहरात खळबळ उडाली असून, हत्येमागील कारणांच्या मुळाशी जाण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

SCROLL FOR NEXT