Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: मुलाच्या नोकरीसाठी आईचे शोषण; अडीचा लाख रूपयांसह दागिनेही लुबाडले

मुलाच्या नोकरीसाठी आईचे शोषण; अडीचा लाख रूपयांसह दागिनेही लुबाडले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या चाळीस वर्षीय विवाहितेच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष देत तब्बल वर्षभर (Crime News) शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर ऑर्डनन्स फॅक्टरीत पीडितेच्या मुलाला लावण्यासाठी अडीच लाख रुपये उकळल्याचे (Jalgaon) पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. रामानंदनगर पोलिसांत (Police) या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Tajya Batmya)

जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीत दोन तरुण मुलांची आई असलेली पीडित कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. तिचे, पती खासगी कंपनीत नोकरीला आहेत. पीडितेच्या शेजारी विक्री असलेले घर आपल्याला घ्यायचे आहे, असे म्हणत विनोद रामदास तायडे (रा.भुसावळ ऑर्डिनन्स फॅक्टरी) याने तिच्या कुटुंबाशी ओळख वाढविली. घरी येणे- जाणे वाढल्यावर मी ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असून तुमच्यापैकी कुणाला नोकरीला लावायचे असल्यास सांगा, पण पैसा खर्च करावा लागेल. मी, सरकारी नोकरीला लावून देईल, असे आश्वासन विनोद तायडे याने पीडित व तिच्या कुटुंबीयांना देत विश्वास संपादन केला.

अडीच लाखही लुबाडले

सदर इसमाने तब्बल वर्षभर महिलेवर अत्याचार करून शोषण केले. कुणास आपल्याबाबत सांगितले तर तुझ्या मुलाला नोकरीला लावून देणार नाही. म्हणून पीडित आजवर गप्प राहिली. दरम्यान, विनोद तायडे याने पीडितेचा मोठा मुलगा याला नोकरीला लावून देण्याचे आमिष देत अडीच लाख रुपये रोख, पिडीतेचे दागिने लुबाडूनही मुलाच्या नोकरीचे काही होत नाही. त्यावर विनोद हा उडवा- उडवीची उत्तरे देत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने कुटुंबासह पोलिस ठाणे गाठत विनोद रामदास तायडे याच्याविरुद्ध तक्रार दिली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक गोपाल देशमुख तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

SCROLL FOR NEXT