Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : आजीच्या घरी गेलेल्या नातवाचे भयानक कृत्य; दागिने विक्रीसाठी जाताच अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Jalgaon News : शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयिताचा शोध घेत तपास केला

Rajesh Sonwane

जळगाव : एकट्या राहत असलेल्या आजीच्या घरी रात्री झोपण्यासाठी गेलेल्या नातवाने आजीनेच दागिने लंपास केले होते. यात त्याने साधारण ६ लाख २ हजार १४० रुपयांचे सोने चोरी करून ते विकण्यासाठी गेला. मात्र याच वेळी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बळीराम पेठेतून अटक करत दागिने हस्तगत केले.

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या गोदावरी पंडित पाटील (वय ८८) हि वुद्धा एकटीच राहत होती. दरम्यान या वृद्धेच्या घरी त्यांची मुलगी आणि नातू हे २३ ऑगस्टला आले होते. यावेळी घरात झोपलेले असताना योगेश पाटील याने कपाटातून वृद्धेचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयिताचा शोध घेत तपास केला. 

संशयित योगेश पाटील हा चोरलेले दागिने विक्रीसाठी बळीराम पेठ परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार योगेशची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरलेले दागिने सापडले. चौकशी केल्यानंतर त्याने हे दागिने आजीच्या घरुन चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दागिने जप्त करून संशयिताला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Bads Of Bollywood: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा दुसरा सीझन कधी येणार? वेब सिरीजमधील अभिनेत्याने केला खुलासा

Crime : भिंतीवर डोकं आपटून २ वर्षांच्या मुलाला संपवलं, नंतर नराधम बापानं स्वत:वर चालवली कुऱ्हाड

Maharashtra Live News Update: शेतकऱ्याने घेतले तहसील कार्यालयातच विष; प्रकृती गंभीर

Thamma Trailer: मेरा बेटा शैतान है...; हॉरर युनिव्हर्समध्ये आयुष्मान-रश्मिकाची एंट्री, थामाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

सदाभाऊ खोतांची पंचाईत, शेतकऱ्यांनी बांध्यावर थांबूही दिलं नाही; थेट हिशोबच मागितला | VIDEO

SCROLL FOR NEXT