Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv

Ulhasnagar News : चोरीला गेलेले ४ लाख २५ हजार रुपयांचे मोबाईल सापडले; सीईआयआर पोर्टलवरून शोध

Ulhasnagar News : उल्हासनगर परिसरातून मागील काही दिवसात मोबाईल चोरी व हरवल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आल्या होत्या
Published on

उल्हासनगर : अनेकदा गर्दीच्या ठिकाणी खिशात ठेवलेले मोबाईल चोरीला किंवा हरवत असतात. या बाबत दाखल तक्रारींवरून पोलिसांनी मोबाईलचा शोध घेत उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी चोरीला गेलेले आणि हरवलेले तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत केले आहेत.

उल्हासनगर (Ulhasnagar) परिसरातून मागील काही दिवसात मोबाईल चोरी व हरवल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार उल्हासनगर हिललाईन पोलिसांकडून तपास सुरु होता. पोलिसांनी सीईआयआर पोर्टलच्या मदतीने विविध राज्यातून तपास करत ३० मोबाईल हस्तगत केले. यात विविध कंपनीचे मोबाईल (Mobile) आहेत. त्यांची साधारण किंमत सव्वाचार लाख आहे. हे मोबाईल ताब्यात घेत मूळ मालकांचा देखील तपास केला. 

Ulhasnagar News
Sambhajinagar Crime : महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चोरांची बेदम मारहाण; हॉस्पिटलमध्ये येण्यास मज्जाव केल्याचा राग

पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलच्या मूळ मालकांचा तपास करत खात्री पटल्यानंतर पोलिसांनी दसऱ्याच्या दिवशी मोबाईल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करून पुन्हा मूळ मालकांना परत केले. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी आदर वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com