Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : दागिने बनविण्यासाठी दिले सोन्याचे तुकडे; १७ लाखांचे सोने घेवुन कारागीर फरार

Jalgaon News : जळगाव शहरातील सराफ बाजार परिसरातील सराफा व्यापारी सोन्याचे तुकडे आणि बिस्कीट देवून बंगाली कारागीरांपासून दागिने घडवून घेत असतात.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सोन्याचे दागिने घडवण्यासाठी व्यापाऱ्याकडे असलेल्या बंगाली कारागीनेच हात साफ केला आहे. (Jalgaon) व्यापाऱ्याने विश्वासाने ठेवलेले सोन्याचे बिस्कीट बॉक्स आणि लगड असा एकूण १७ लाख रुपयांचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने (Gold) घेऊन बंगाली कारागीर फरार झाला आहे.  याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

जळगाव शहरातील सराफ बाजार परिसरातील सराफा व्यापारी सोन्याचे तुकडे आणि बिस्कीट देवून बंगाली कारागीरांपासून दागिने घडवून घेत असतात. सराफ व्यावसायिक शुभम प्रदीप वर्मा (वय ३०) आणि खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा हे देखील बंगाली कारागीर यांच्याकडे विश्वासाने सोन्याचे तुकडे किंवा सोन्याचे बिस्किटे देवून दिलेल्या ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून घेतात. या विश्वासावर दोन्ही सोन्याचे व्यापारी वर्मा आणि शर्मा यांनी २७ मार्चला सायंकाळी पाचला बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन (वय २८) याला १५ लाख रुपये (Crime News) किमतीची २५४ ग्रॅम सोन्याची लगड आणि २ लाख रुपये किमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट असे एकूण १७ लाखांचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


कारागीर झाला पसार
बंगाली सोने कारागीर शेख अमीरूल हुसेन हा १७ लाखांचे सोने घेऊन पसार झाल्याचे उघडकीला आले. यासंदर्भात सोन्याचे व्यापारी शुभम वर्मा आणि खेतेंद्र शर्मा यांनी पोलीसात धाव घेतली. त्यानुसार शनीपेठ (Police) पोलिस ठाण्यात बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेल नसल्याचे कारण देत अॅम्बुलन्स सेवा नाकारली गरोदर महिलेच्या पोटात नवजात बाळाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात मोठ झाड कोसळले; 12 दुचाकी झाडाखाली अडकल्या

Online earning ideas: घरबसल्या पैसे कसे कमावू शकता?

Petrol- Diesel Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार? सर्वसामान्य नागरिक चिंतेत

Bhagyashree Mote Photos: सबसे कातील, भाग्यश्रीचे फोटो पाहून हेच म्हणाल

SCROLL FOR NEXT