Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; जळगावतील धक्कादायक घटना

Jalgaon News : शनिपेठ परिसरात विवाहित महिला परिवारासह वास्तव्याला आहे. कौटुंबिक कारणावरून पतीसोबत भांडण होत असल्याचा गैरफायदा

Rajesh Sonwane

जळगाव : महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशात जळगाव शहरात देखील एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर एकाने अत्याचार केला असून यातून पीडिता गर्भवती राहिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

जळगाव (Jalgaon) शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदरची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिपेठ परिसरात विवाहित महिला परिवारासह वास्तव्याला आहे. कौटुंबिक कारणावरून पतीसोबत भांडण होत असल्याचा गैरफायदा घेऊन संशयित तुषार राजेंद्र अहिरे (वय २८) याने विवाहितेसोबत संबंध ठेवण्यास सुरवात केली. तसेच पतीला घटस्फोट देऊन मी तुझ्याशी लग्न करेल, असे सांगून तिच्याशी जवळीक (Crime News) साधून तिच्यावर अत्याचार केला. 

सदरचा प्रकार मे २०१८ पासून सुरू होता. त्यानंतर या अत्याचारातून विवाहिता गर्भवती राहिली. मात्र तुषार याने विवाहितेसोबत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकारानंतर विवाहितेने ५ ओक्टोम्बरला शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून संशयित तुषार अहिरे याच्याविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिपेठ पोलिसांनी तुषार अहिरे याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

SCROLL FOR NEXT