Chopda Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Chopda Bribe Case : वाळूसाठी मागितली १० हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या ताब्यात

Jalgaon News : चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठी रवींद्र काशिनाथ पाटील (वय ५०) असे एसीबीने ताब्यात घेतलेल्या लाचखोर तलाठ्याने नाव आहे

Rajesh Sonwane

चोपडा (जळगाव) : घरकुल बांधकामासाठी लाभार्थीला वाळूची आवश्यकता होती. यामुळे नदीतून वाळू वाहतूक करू देण्यासाठी लाभार्थ्यांकडून लाच स्वीकारताना तलाठीला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचखोर तलाठीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

चोपडा (Chopda) तालुक्यातील विटनेर येथील तलाठी रवींद्र काशिनाथ पाटील (वय ५०) असे एसीबीने ताब्यात घेतलेल्या लाचखोर तलाठ्याने नाव आहे. पाच हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. विटनेर येथील एकास पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल मंजूर झाले होते. घरकुलाच्या बांधकामासाठी वाळू लागत होती. ट्रॅक्टरने वाळू वाहतुकीसाठी तलाठी रवींद्र पाटील यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. 

दरम्यान याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली. त्यानुसार तलाठी रवींद्र पाटील यांनी २८ मे रोजी वाळू वाहतुकीच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची रोकड स्वीकारत असताना पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे आणि पथकाने त्यांना मुद्देमालासह पकडले. त्यांच्यावर चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात वाघाच्या हल्यात महिला ठार

OBC Reservation: ''आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळ यांचा शरद पवारांना सवाल

Dudhi Halwa Recipe : नवरात्रीचा प्रसाद होईल स्पेशल, झटपट बनवा दुधीचा चविष्ट हलवा

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

SCROLL FOR NEXT