Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षक चालवायचा चोरीचे रॅकेट; चोपडा बसस्थानकावरील घटनेने झाली पोलखोल, रंगेहाथ पकडलं

Jalgaon News : चोपडा बसस्थानकावर एका शेतकऱ्याचे ३५ हजार रूपये चोरी करून तीन ते चारजण पळून जात होते. मात्र हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पळणाऱ्या चार चोरांचा पाठलाग पोलिसांनी सुरु केला

संजय महाजन

चोपडा (जळगाव) : जालना पोलीस प्रशासनाला हादरवणारी घटना जळगावमध्ये समोर आली आहे. जालन्याचे पोलीस उपनिरीक्षक ऑनड्युटी चोरी प्रकरणात अडकले असून ते राज्यभरातील बसस्थानकांवर चोरीचे रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कारमध्ये स्वयंपाकासह अंथरून, पांघरून घेऊन फिरत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकावर एका शेतकऱ्याचे ३५ हजार रूपये चोरी करून तीन ते चारजण पळून जात होते. मात्र चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पळणाऱ्या चार चोरांचा पाठलाग पोलिसांनी सुरु केला. यानंतर चोपडा पोलिसांनी चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये एक जालना येथील पोलिस उपनिरीक्षक चक्क ऑनड्यूटी असल्याचीही माहिती समोर आली आहे. 

चोरांना प्रशिक्षण देत राज्यभरात चालवायचा रॅकेट 

चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रल्हाद पिरोजी मान्टे असे अटकेतील जालना येथील पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून तो राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने बाकी असताना चोपडा बसस्थानकावर चोरी करण्यासाठी प्रल्हाद मान्टे आला होता. त्याने चोरीची कबुली दिली आहे. तर बसस्थानकांवरील चोरीच्या घटनांमध्ये त्याचा हातखंडा असल्याने तो अनेक चोरांना प्रशिक्षण देखील देत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

कारमध्येच अंथरूण, पांघरून  
दरम्यान राज्यभरात वेगवेगळ्या बसस्थानकांमध्ये चोरी करण्याचे रॅकेट चालविणारा पोलीस उपनिरीक्षक मान्टे हा पकडले जावू नये म्हणून कधीही हॉटेल किंवा लॉजवर थांबत नव्हता. तर त्याच्या कारमध्येच स्वयंपाक बनवण्याचे सर्व साहित्य, अंथरूण- पांघरून सोबत असायचे. हे सर्व साहित्य देखील चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT