UPSC Exam Result Saam tv
महाराष्ट्र

UPSC Exam Result: UPSC मध्ये जिल्ह्याचं नाव केलं 'रोशन', इंजिनीअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडलं, आजोबांचं स्वप्न केलं पूर्ण

UPSC मध्ये नाव केले ‘रोशन’..अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडत आजोबांचे स्वप्न केले पूर्ण

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असताना ते अर्धवट सोडून यूपीएससीची वाट धरली अन्‌ वेळेचे नियोजन करून आत्मविश्वासाच्या बळावर ‘यूपीएससी’तून (UPSC) दुसऱ्याच प्रयत्नात यश (Chalisgaon) संपादन केले. असे करत आजोबांचे स्‍वप्‍न साकारले ते वरखेडे (ता. चाळीसगाव) गावातील रोशन कच्‍छवा या तरुणाने. (Breaking Marathi News)

वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील शेतकरी कुटुंबातील व आश्रमशाळा कर्मचाऱ्याचा मुलगा असलेल्या रोशन केवलसिंग कच्छवा याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा २०२२ परिक्षेत (UPSC Exam) देशभरातून ९३३ विद्यार्थ्यांमध्ये ६२० वी रँक मिळवून वरखेडे गावाचा डंका देश पातळीवर पोहचवला आहे.

आजोबाचे स्वप्न केले पुर्ण

रोशनचे आजोबा (कै.) जयसिंग दोधु पाटील यांनी रोशन लहान असतांना आपला नातू युपीएससीची परिक्षा उत्तीर्ण व्हावा, असे स्वप्न पाहिले होते. आजोबाचे हे स्वप्न रोशनने युपीएससीला गवसणी घालून पूर्ण केले. युपीएससीचा अभ्यास त्याने एकाग्रता व झपाटून अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात पुर्व परिक्षा उत्तीर्ण झाला. मात्र अंतिम परिक्षेने यशापासून हूलकावणी दिली. त्यामुळे रोशन नाऊमेद झाला नाही. पुन्हा अभ्यासाला लागला आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्याने युपीएससीत यश मिळविले. यासाठी त्याला आई- वडिल, भाऊ तसेच काका विक्रमसिंग कच्छवा यांचे मार्गदर्शन लाभले.

इंजिनिअरींग सोडले अर्धवट

वडिल केवलसिंग कच्छवा हे सर्वोदय शिक्षण संस्थेच्या धामणगाव आश्रम शाळेत क्लर्क आहेत. तर आई गृहिणी आहे. रोशन याचे पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण गुढे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर चौथी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. सहावी व दहावीपर्यंतचे शिक्षण चाळीसगाव येथील अभिनव विद्यालयात झाले. बारावी पूर्ण केल्यानंतर पुण्याला इंजिनिअरींगला प्रवेश घेतला. मात्र इंजिनिअरींगमध्ये त्याचे मन काही रमले नाही. इंजिनिअरींग अर्धवट सोडून नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात बीएसाठी प्रवेश घेतला. तेथे बीए पूर्ण केल्यानंतर त्याने सरळ युपीएससीला गवसणी घालण्याचा निर्धार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, माथेफिरू तरुणाला अटक; उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

SCROLL FOR NEXT