Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News : अमावस्येला गुप्‍तधन काढण्याची तयारी; चाळीसगावी मांत्रिकासह नऊ जण ताब्यात

अमावास्येला गुप्‍तधन काढण्याची तयारी; चाळीसगावी मांत्रिकासह नऊ जण ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : गुप्तधन काढण्यासाठी शेतातील पडीक घरात मानवी कवटीच्या अवतीभवती (Chalisgaon) बसून पूजा करणाऱ्या मांत्रिकासह नऊ जणांना शहर पोलिसांनी (Police) घटनास्थळावरून पूजेच्या साहित्यासह मोबाईल फोन, कार असा सुमारे आठ लाख ३५ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. (Maharashtra News)

चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरातील पेट्रोलपंपाच्या बाजूच्या शेतातील पडीक घरात काही मांत्रिक गुप्तधन काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तेथे छापा टाकला असता मांत्रिकासह काही जण गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने पूजा करताना मिळून आले. सर्व जण मानवी (Jalgaon News) कवटीच्या सभोवताली बसलेले होते. मांत्रिक त्याचे साथीदार अघोरी पूजा करताना आढळून आले.

याप्रकरणी लक्ष्मण श्यामराव जाधव (रा. चाळीसगाव), शेख सलीम कुतुबुद्दीन शेख (रा. चाळीसगाव), अरुण कृष्णा जाधव (रा. आसरबारी, ता. पेठ, जि. नाशिक), विजय चिंतामण बागूल (जेल रोड, नाशिक रोड), राहुल गोपाल याज्ञीकरा (रा. ननाशी, ता. दिंडोरी, जि. नाशिक), अंकुश तुळशीदास गवळी (रा. जोरपाडा, ता. दिंडोरी, जि. नाशिक), संतोष नामदेव वाघचौरे (रा. अशोकनगर, नाशिक), कमलाकर नामदेव उशिरे (रा. गणेशपूर पिंप्री, ता. चाळीसगाव) व संतोष अर्जुन बाविस्कर (रा. अंतुर्ली, ता. एरंडोल) या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT