मेहुणबारे (जळगाव) : आजोबांचे निधन झाल्याने आईसमवेत मुलगा आपल्या मामाच्या गावी थांबला होता. दरम्यान नातलगातील सोबतच्या मुलांसोबत गिरणा नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पिलखोड (ता. चाळीसगाव) परिसरात घडली.
मालेगाव (Malegaon) तालुक्यातील हिसवाळ येथील ओम विजय चव्हाण (वय १८) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे मामाच्या गावी आला होता. दरम्यान गिरणा नदीला पाणी सोडण्यात आल्याने नदीत पोहण्याचा मोह आल्याने ओम हा त्याच्या नातेवाईकांसह तिघेजण पोहण्यासाठी उपखेडच्या (Girna River) गिरणा पात्रात गेले. पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण पोहताना वाहून जात असताना कसे तरी बचावले. मात्र ओम हा पाण्यात वाहुन गेला.
सदर घटनेची माहिती गावात समजताच गिरणा नदीत शोध घेण्यासाठी ग्रामस्थ आले. मात्र ओम पाण्याच्या वेगवान (Chalisgaon) प्रवाहात गेल्याने त्याचा शोध लागत नव्हता. गावकर्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. तसेच घटनेची माहिती मेहूणबारे पोलीसांना दिल्यानंतर पोलीसही दाखल झाले. मात्र ओमचा मृतदेह दुसऱ्या दिवशी २४ तासानंतर वरखेडे धरणाच्या गेटजवळ पाण्यात आढळून आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.