Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : मित्रांसोबत रनिंगला गेला असता घडले भयानक; बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील रिंकेश गणेश मोरे (वय १३) याचा घटनेत मृत्यू झाला आहे. रिंकेश हा तीन मित्रांसोबत पाटणा रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास रनिंग करण्यासाठी गेला होता

Rajesh Sonwane

मेहुणबारे (जळगाव) : रोज ठरल्याप्रमाणे मित्र सायंकाळी रनिंगसाठी गेले होते. गावापासून काही अंतरावर गेले असता रस्त्यावर समोर बिबट्या नजरेस पडला. यावेळी बिबट्याने हल्ला केला असता एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर शिवारातील पाटणा रस्त्यावर घडली.

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील गणेशपूर येथील रिंकेश गणेश मोरे (वय १३) याचा घटनेत मृत्यू झाला आहे.  रिंकेश हा तीन मित्रांसोबत पाटणा रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास रनिंग करण्यासाठी गेला होता. सर्वांच्या पुढे धावत असलेल्या रिंकेशला काही अंतरावर बिबट्या दिसला. बिबट्याला (Leopard Attack) पाहताच रिंकेशने मागे धावत येणाऱ्या मित्रांना आवाज देऊन तो स्वतः जवळच्या एका झाडावर चढला. त्याच्या मागून धावणाऱ्या मित्रांनी हे पाहताच, तिघे मागच्या मागे गावाकडे पळाले. गावात येताच त्यांनी सदर घटनेची माहिती दिली. 

यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली. गावापासून एक किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी रिंकेश झाडावर चढला होता, त्या ठिकाणी रिंकेश आढळून आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला असता एका ठिकाणी रक्त पडलेले दिसून आहे. त्यामुळे ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता रिंकेशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मानेजवळ दातांचे निशाण होते, तर त्याचा मागचा भाग खाल्लेला आढळून आला. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना कळताच त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी पिंजरा लावण्यात येत असल्याचे पोलिस पाटलांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway : मुंबई ते सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालविण्याची कोकणवासियांची मागणी, कारण काय? वाचा

Saam TV exit poll: वसई-विरारमध्ये बहुजन विकास पक्ष सत्ता राखणार? भाजपचे प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यता

Saam Tv Exit Poll: कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष, भाजपला किती जागा मिळणार? पाहा एक्झिट पोल

Exit Poll : उल्हासनगरमध्ये शिंदेंचं वर्चस्व, पण सत्तेसाठी भाजपला सोबत घ्यावं लागणार?

Saam TV Exit Poll : भिवंडीत कुणाची सत्ता? ६ बिनविरोध जागा येऊनही भाजपचं काय? पाहा महाएक्झिट पोलचा अंदाज

SCROLL FOR NEXT