Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : शेतातील मोटार सुरु करताना घडले दुर्दैवी; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Jalgaon Bodwad News : पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत असलेला विद्युत पंप चालू करण्यासाठी गेला. इलेक्ट्रीक खांबवर असलेली लोखंडी पेटी उघडत असतांना त्याला अचानक विजेचा धक्का लागला. यामुळे तो फेकला गेला

Rajesh Sonwane

जळगाव : विहिरीतील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी तरुण शेतात गेला होता. मोटार सुरु करण्यासाठी लावलेली पत्री पेटी उघडताच भयंकर घडले. या पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याने विजेचा जोरदार झटका बसल्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बोदवड तालुक्यातील वाकी शिवारामध्ये घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

जळगावच्या बोदवड तालुक्यातील वाकी येथील जितेंद्र प्रल्हाद पाटील (वय ३०) असे मृत तरूणाचे नाव आहे. जितेंद्र पाटील हा तरूण कुटुंबियांसह बोदवड तालुक्यातील वाकी गावात वास्तव्यास होता. शेतीचे काम करत तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच त्याच्यावर मृत्यूने झडप घातली असून या घटनेने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. 

पेटी उघडताना विजेचा झटका 

दरम्यान २० ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जितेंद्र पाटील हा शेतात गेला होता. पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत असलेला विद्युत पंप चालू करण्यासाठी गेला. इलेक्ट्रीक खांबवर असलेली लोखंडी पेटी उघडत असतांना त्याला अचानक विजेचा धक्का लागला. यामुळे तो फेकला गेला. हि घटना आजूबाजूचा शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत त्याला तातडीने बोदवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

कुटुंबीयांचा आक्रोश 

रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषीत केले. जितेंद्रच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना कळताच परिसराने एकच आक्रोश केला. तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैणात

Maharashtra Live News Update: इंडिगोच्या विमानसेवेच्या गोंधळाचा फटका नागपुरात पोहचणाऱ्या मंत्री-आमदारांना

Nagpur : हिवाळ्यात नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापणार, विरोधक सरकारला घेरणार, कोणते मुद्दे गाजणार?

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार ३०० फूट दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT