Cremation Saam
महाराष्ट्र

धक्कादायक! अंत्यसंस्कारानंतर आजींच्या अस्थी गेल्या कुठे? नातेवाईकांची पोलीस ठाण्यात धाव, मग झाला मोठा खुलासा

Jalgaon Bhusawal crematorium news : भुसावळ स्मशानभूमीत वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या अस्थी गायब झाल्याने एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर, एका तरुणाने चुकून वडिलांच्या ऐवजी वृद्ध महिलेच्या अस्थी तापी नदीत विसर्जित केल्याचे उघड झाले.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Bhusawal News : जळगावमधील भुसावळ स्मशानभूमीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरूणाकडून वडिलांच्या ऐवजी वृद्ध महिलेच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. वृद्ध महिलेच्या अस्थी स्मशनातभूमीतून गायब झाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हा सर्व गोंधळ समोर आला. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केलाय.

वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर अस्थी गायब झाल्या, मिळाल्याच नाहीत, त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. अस्थी चोरीच्या संशयावरून मृत वृद्ध महिलेचे नातेवाईक पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले होते. मात्र एका तरुणाने आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर वडिलांच्या अस्थिऐवजी चुकून मृत वृद्ध महिलेच्या अस्थि विसर्जित केल्याचे उघड झाल्यानंतर गोंधळ मिटला.

अस्थींचा गोंधळ का उडाला ?

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे तापी नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत मृतांच्या अस्थींवरुन गोंधळ उडाला. एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर त्या जागी अस्थी मिळून न आल्याने हा गोंधळ उडाला. अस्थी चोरीच्या संशयावरून मृत वृद्ध महिलेचे नातेवाईक थेट पोलीस स्टेशनला पोहोचले, मात्र त्या ठिकाणी वस्तुस्थिती समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. ज्या ठिकाणी वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्याच्या बाजूलाच एका वृद्ध व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अंत्यसंस्कारावेळी हजर नसलेला मुलगा हा उशिरा पोहोचल्याने वडिलांचे अंत्यसंस्कार नेमके कुठल्या जागी झाले? याची माहिती नव्हती. त्यामुळे ज्या ठिकाणी वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार झाले होते, तेथील वडिलांच्या अस्थी समजून त्यामुळे अस्थी संचय करत तापी नदीत विसर्जित केल्या. त्यामुळेहा संपूर्ण गोंधळ उडाला.

तरूणाने माफी मागितली...

या प्रकारानंतर मृत वृद्ध महिलेच्या अस्थी विसर्जित केल्यामुळे तरुणाने कुटुंबीयांची माफीही मागितली. मात्र स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार ठिकाणी नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे तसेच ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात? त्या ठिकाणी नंबर देण्यात यावे व मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची नोंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Travel With Baby : लहान मुलांसोबत पहिलीच ट्रिप प्लान करताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीसमोर येणार 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य; नागराजचा खेळ संपला, सुमन करणार नवऱ्याचा पर्दाफाश| VIDEO

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये 34 नगरसेवकांना घेऊन काँग्रेसने आपला गट स्थापन केला

Sneezing : सतत येणाऱ्या शिंकांनी हैराण झालात? मग 'हे' उपाय एकदा करून पाहाच, मिनिटांत मिळेल आराम

Sunita Ahuja: 'तो नेहमीच शुगर डॅडी शोधण्याऱ्या मुलींच्या चक्करमध्ये...'; गोविंदाबद्दल पत्नी सुनीताचा पुन्हा एक धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT