Jalgaon News Bribe Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: २५ हजाराची लाच, ग्रामसेवक जाळ्यात; जळगाव ‘एसीबी’ची कारवाई

२५ हजाराची लाच, ग्रामसेवक जाळ्यात; जळगाव ‘एसीबी’ची कारवाई

साम टिव्ही ब्युरो

कळमसरे (जळगाव) : नीम (ता. अमळनेर) येथील ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील यास वीटभट्टी चालकाकडून २५ हजारांची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत विभागाने (ACB) पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून ग्रामसेवकास अटक करण्यात आली आहे. (Letest Marathi News)

तक्रारदार विटभट्टी चालकास ना हरकत दाखला देण्यासाठी १७ जानेवारीस ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांनी २७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती सोमवारी (ता. २३) नीम ग्रामपंचायत कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. तक्रारदारांचा नीम ग्रामपंचायत हद्दीत सुमारे ३० वर्षांपासून वीटभट्टीचा व्यवसाय आहे.

रॉयल्‍टी भरल्‍यानंतरही

तक्रारदारांनी नियमाप्रमाणे अमळनेर तहसील कार्यालयात ६ हजार रॉयल्टी भरलेली आहे. तरी सुद्धा तक्रारदारांना नीम ग्रामपंचायत हद्दीत जर वीटभट्टी व्यवसाय करायचा असेल; तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल, असे सांगितले. तसेच नीम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक राजेंद्र पाटील याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष २७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. लाच मागणी केलेल्या रकमेपैकी २५ हजार रोख रक्कम पंचासमक्ष नीम ग्रामपंचायत कार्यालयात स्वत: स्वीकारताना पकडण्यात आले आहे. मारवड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

दरम्यान, यासाठी सापळा व तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक (Jalgaon ACB) लाचलुचपत प्रतिबंध विभाग (जळगाव) शशिकांत पाटील, सहसापळा अधिकारी व पथक पोलिस अधीक्षक संजोग बच्छाव, पोलिस कर्मचारी ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे, कारवाई मदत पथक पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, बाळू मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री

Kandyachi Chutney Recipe : ना परतायची गरज ना भाजायची, फक्त ५ मिनिटांत 'अशी' बनवा कांद्याची झणझणीत चटणी

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या नावावर तब्बल १०० मालमत्ता, किंमत जवळपास २०० कोटींहून अधिक

Famous Actor Father Death : प्रसिद्ध अभिनेत्याला पितृशोक; वाढदिवशीच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

Fack Check : केंद्र सरकारची नवी योजना, रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत मोबाईल?

SCROLL FOR NEXT