Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : दुचाकीला कट लागल्याचा राग; बेदम मारहाणीत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : अमळनेर शहरातील अंकलेश्वर येथील विकास प्रवीण पाटील (वय ३०) हा मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या मोटरसायकलला कार चालकाने कट मारला.

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : रस्त्यावरून जात असताना कारमधील तरुणांकडून दुचाकीला कट मारला. दुचाकीला कट मारल्याने दुचाकीस्वार व कारमधील तरुणांमध्ये वाद झाला. या वादात एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील जळोद-अमळगाव शिवारात घडली. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

अमळनेर (Amalner News) शहरातील अंकलेश्वर येथील विकास प्रवीण पाटील (वय ३०) हा मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या मोटरसायकलला कार चालकाने कट मारला. यात दुचाकीचे इंडिकेटर तुटले. यामुळे कार चालक व दुचाकीवरील दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दरम्यान अमळगाव- जळोद रस्त्यावर हाणामारी झाली. त्यानंतर काही जणांनी लोखंडी रॉड, दांडके घेऊन आले. त्यात विकास पाटील हा पळत सुटला. मात्र त्याला गाठून संशयित आरोपींनी मारहाण करून त्याला बेदम मारहाण (Crime News) करत जीवे मारले. यानंतर तेथून पसार झाले. सदरची घटना ३ नोव्हेंबरला पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. 

दरम्यान मृत विकास पाटील याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. तेथे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनास्थळावरून आरोपी फरार झाले आहे. मात्र पोलिसांनी तपास करत एलसीबीच्या पथकाने जामनेर तालुक्यात तिघांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी अमोल वासुदेव कोळी, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, मनोज हनुमंत श्रीगणेश, कमलाकर हनुमंत श्रीगणेश, रोहित सीताराम पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून अमोल कोळी, नितीन पवार, हर्षल गुरव यांना जामनेर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT