Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : घरी जाण्यासाठी घेतली लिफ्ट अन्‌ मृत्यूने गाठले; जीपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान २३ जानेवारीला दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर गाव जवळच असल्याने तो टहाकळी येथे जाण्यासाठी पायी निघाला

Rajesh Sonwane

जळगाव : महाविद्यातून घरी जाण्यासाठी तरुणाने दुचाकीवर लिफ्ट मागितली. मात्र या तरुणाला रस्त्यातच मृत्यूने गाठल्याची घटना घडली आहे. धरणगाव तालुक्यातील टहाकळी येथील तरुण अपघातात जखमी झाला असताना त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूने आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. 

धरणगाव तालुक्यातील टहाकळी येथील महेश संजय पाटील (वय १८) असे मृत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे नाव आहे. टहाकळीत महेश आई, वडील आणि मोठी बहिणीसोबत वास्तव्याला होता. तो पाळधी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान २३ जानेवारीला दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर महेश घरी जाण्यासाठी निघाला. महाविद्यालयापासून गाव जवळच असल्याने तो टहाकळी येथे जाण्यासाठी पायी निघाला होता. 

गावातील व्यक्तीने बसविले गाडीवर 

दरम्यान त्याच्या गावातील प्रभाकर पाटील हे कंपनीतून घरी जात होते. त्यांनी महेशला दुचाकीवर बसवून घेतले. मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या बोगद्यातून जात असताना, अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात महेश गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना ३१ जानेवारीला रात्री त्याचा मृत्यू झाला. 

एकुलता एक मुलगा गेला 

महेश हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याला लहान बहीण आहे. दरम्यान अपघातात एकुलता एक मुलगा गेल्याने आई- वडिलांनी व नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. या घटनेबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृत महेशच्या मागे आई छायाबाई, वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT