सांगली : सांगलीच्या गावभागमध्ये एका आपर्टमेंट मधील फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये फ्लॅट मधील केटरर्स साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आपर्टमेंट मधल्या दहा फ्लॅटच्या काचा, त्याबरोबर तीन वाहनांच्या काचा देखील स्फोटाच्या आवाजाने फुटले आहेत.
सांगली शहरातील गावभाग परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आज सकाळच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. व्यंकटेश केटर्स नामक व्यवसायिकाचा या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट होता. त्यांच्या फ्लॅटमध्ये सर्व साहित्य आणि गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र गॅस सिलेंडरमधील गॅस लिकेज होऊन सकाळच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला.
आवाजाने उडाली धावपळ
सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. अचानकपणे प्रचंड आवाजाचा स्फोट झाल्याने आपर्टमेंट मधल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. तर अपार्टमेंटमधील नागरिकांची देखील आरडाओरड व धावपळ सुरु झाली होती. फ्लॅटमधून धूर निघत असल्याने आग वाढू नये या दृष्टीने अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन विभागाचे पथक दाखल होऊन यावर नियंत्रण मिळविले.
मोठी दुर्घटना टळली
दरम्यान सिलेंडरच्या स्फोटामुळे मोठी दुर्घटना होण्याचे टळले असून या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र फ्लॅटमध्ये ठेवलेल्या व्यंकटेश केटर्सच्या साहित्यांच्या बरोबर फ्लॅट धारकांच्या घरांचे काचा आणि वाहनांच्या काचा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या देखील गॅसच्या स्फोटाच्या आवाजाने फुटलेले आहेत. मात्र हा स्फोट कसा झाला; हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.