Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

Jalgaon News : बचत गटाचे शिबिर असल्याने जळगावी आल्या होत्या. हे शिबीर आटोपल्यानंतर पती जुम्मा तडवी यांच्यासोबत दुचाकीने सावखेडासिम येथे घरी जाण्यासाठी निघाल्या. समोरून भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक

Rajesh Sonwane

जळगाव : जळगावला कामानिमित्ताने आलेले पती- पत्नी दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र समोरून भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू गाडीने दुचाकीला जोरदार धडक विळी. यात मागे बसलेल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार पती गंभीर जखमी आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव- ममुराबाद रस्त्यावर हा अपघात झाला असून यावल तालुक्यातील सावखेडसिम येथील संजिदा जुम्मा तडवी (वय ४२) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान संजिदा तडवी बचत गटाचे शिबिर असल्याने जळगावी आल्या होत्या. हे शिबीर आटोपल्यानंतर पती जुम्मा तडवी यांच्यासोबत दुचाकीने सावखेडासिम येथे घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. याच वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिली.  

जळगाव येथून निघाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास ममुराबाद रस्त्यावरील प्रजापतनगर जवळ एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेट संजिदा तडवी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी त्यांचे पती जुम्मा तडवी यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

वाहन घेऊन चालक फरार 

अपघात घडल्यानंतर रस्त्यावरील वाहन धारकांनी मदतीचा हात दिला. मात्र दुचाकीला धडक देणारे वाहन चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फरार वाहन चालकाचा शोध सुरु असून या प्रकरणी पोलिस नाईक प्रदीप राजपूत तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Waking up at 3am: रात्री नेमकी ३ वाजताच जाग येते? कारणं जाणून घ्या आत्ताच

Maharashtra News Live Update: बारामती-राहुरी पोटनिवडणूक सार्वजनिक सुट्टी, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

Bollywood Couple Pregnant: पुन्हा गोड बातमी! बॉलिवूड स्टार कपलच्या घरी 'बेबी नं. 2'ची चाहूल

Bigg Boss Marathi 6 : थेट घराबाहेर पडणार 'हा' सदस्य, टॉप ५ च्या शर्यतीतून विजेतेपदाचा तगडा स्पर्धक OUT

Gold Price Today: अक्षय्य तृतीयेला सोनं महागलं की स्वस्त झालं? खरेदीआधी किंमत घ्या जाणून

SCROLL FOR NEXT