Accident News
Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident: अंत्‍यविधीवरून परतले अन्‌ झाला घात; दोन वर्षाच्‍या चिमुकलीचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : उंबरखेडे (ता.चाळीसगाव) येथे अंत्यविधीसाठी आलेल्या नरडाणे येथील दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक (Accident) दिली. त्यात त्‍यांच्‍या सोबत असलेली दोन वर्षाची चिमुकली ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच (Accident Death) ठार झाली. तर पती व पत्नीस मार लागला. (Jalgaon Accident News)

सदर घटना (Chalisgaon) चाळीसगाव- धुळे रस्त्यावर दहीवद फाट्याजवळ घडली. चाळीसगाव- धुळे (Dhule) रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नामुळे या मार्गावर मोठ्याप्रमाणावर अपघात वाढले आहे. रस्त्याच्या दुर्देशेमुळेच दोन वर्षाच्या चिमुकलीचा बळी गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस (Police) ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंत्‍यविधीवरून परतले अन्‌

उंबरखेडे (ता.चाळीसगाव) येथील गोरख दिनकर पाटील यांचे भाचजावई तुषार त्र्यंबक भामरे (रा. पिंप्राळा नरडाणे ता. शिंदखेडा) हे दुचाकीने पत्नी हेमांगी व दोन वर्षाची मुलगी गितांजली यांच्‍या समवेत उंबरखेड येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी आले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर दुचाकीने उंबरखेड येथून नरडाणाकडे जात होते.

खड्डे चुकवताना झाला अपघात

चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दहीवद फाट्याच्या पुढे तुषार भामरे हे रस्त्याच्या कडेने हळूवार खड्डे चुकवत जात असतांना मागाहून येणाऱ्या मालवाहू टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तुषार भामरे हे पत्नी हेमांगी भामरे व त्यांच्या मांडीवर बसलेली मुलगी गितांजली (2 वर्षे) मोटारसायकलवरून खाली पडले. त्याचवेळी गितांजलीच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्‍यू झाला. क्षणात घडलेल्या हा भयंकर प्रकार पाहून तुषार भामरे यांनी आरडओरड केली असता धडक देणाऱ्या टँकरचा चालक रस्त्यावर टँकर सोडून पळून गेला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT