Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : घरी परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू

Jalgaon News : अपघात झाल्यानंतर साधारण अर्धा तास ते रस्त्यावर जखमी अवस्थेत पडून असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन वृद्धाचा जागीच मृत्यू झाला होता. मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : काम आटोपून रात्रीच्या सुमारास घरी जात असताना मोटारसायकलचा अपघात झाला. मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात डोक्याला मार लागल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली आहे. ही घटना अमळनेर तालुक्यातील मंगरूळ शिवारात सोमवारी (ता. ६) रात्री घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांची एकच आक्रोश केला. 

चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील संतोष चिंतामण चंदासरे (वय ६०) असे अपघातात मृत झालेल्या वृद्धांचे नाव आहे. संतोष चंदासरे हे कामानिमित्त अमळनेर शहरात आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीवरून गावी परत जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान अमळनेर- चाळीसगाव मार्गावर मंगरूळजवळ दुचाकी घसरली. यात संतोष चंदासरे हे जबर जखमी झाले. चंदासरे यांच्या डोक्याला मार लागला होता. 

मदत मिळण्यास उशीर 

दरम्यान रात्रीची वेळ असल्याने या मार्गावरून रहदारी नव्हती. यामुळे अपघात झाल्यानंतर साधारण अर्धा तास ते रस्त्यावर जखमी अवस्थेत पडून होते. काही वेळानंतर अपघात झाल्याचे लक्षात आल्याने हॉटेल चालकांसह काही नागरिकांनी त्यांना उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच चंदासरे यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला. 

दुचाकीच्या धडकेत एक जण जखमी
जळगाव : कामावर पायी जात असलेले कादर हिलाल पटेल (वय ४३) यांना दुचाकीने धडक दिल्यामुळे ते जखमी झाले. ही घटना आर. एल. चौफुली ते फातेमा नगर दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सचिन पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वास्तूचे हे उपाय करा; दिवाळीत पडेल पैशांचा पाऊस

Bhaji Recipe: भजी जास्त तेलकट होतायत? ट्राय करा ही सोपी रेसिपी

Maharashtra Politics: भाजपचा शरद पवार आणि काँग्रेसला दणका; आमदाराच्या मुलासह बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Amboli Tourism : 'आंबोली'ला गेल्यावर काय काय पाहाल? पटकन नोट करा सुंदर ठिकाणांची नावे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणीला दिवाळीचा हप्ता कधी येणार?

SCROLL FOR NEXT